छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस: युनेस्को जागतिक वारसा स्थळ-मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस एम टी या नावानेही ओळखले जाते. भारतीय मध्य रेल्वेचे एक प्रमुख स्थानक आहे. मुंबई शहराच्या दक्षिणेकडे हे रेल्वे स्थानक आहे. 20 जून 1887 या दिवशी ब्रिटिश सम्राज्ञी व्हिक्टोरिया च्या राज्याभिषेकास 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या रेल्वेस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले होते. ब्रिटिश इंजिनीयर फ्रेडरिक विल्यम स्टीवेन्स यांच्या मार्गदर्शनाखाली या रेल्वे स्थानकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. युनेस्कोने 2004 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला मान्यता दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा इतिहास
भारतामध्ये सर्वप्रथम 1853 मध्ये ठाणे ते बोरीबंदर ही पहिली रेल्वे धावली.1853 ते 1887 या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचे नाव बोरिबंदर स्थानक असे होते. 1887 ते 1996 पर्यंत व्हिक्टोरिया टर्मिनस असे नाव होते. 1996 ते 2017 पर्यंत छत्रपती शिवाजी टर्मिनस असे करण्यात आले. 2017 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे सध्याचे नाव बदलण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थापत्य
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे स्थापत्य वैशिष्ट्यपूर्ण असून यामध्ये व्हिक्टोरियन गॉथिक,इटालियन गॉथिक आणि भारतीय अभिजात पारंपारिक स्थापत्य शैलीचा संगम पहावयास मिळतो. यापूर्वी मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेज आणि मुंबई विद्यापीठाची इमारत याच शैलीमध्ये बांधलेले आहेत. मुख्य इमारतीवर अनेक मनोरे आणि मध्यभागी घुमट बांधलेला आहे.’c ‘सी या इंग्रजी अक्षराप्रमाणे या इमारतीची रचना आहे. 1950 मध्ये मुख्य घुमटा समोर असलेला व्हिक्टोरिया राणीचा संगमरवरी पुतळा तिथून हलवून मुंबई येथील राणीच्या बागेमध्ये स्थापन करण्यात आला होता.1980 पर्यंत व्हिक्टोरिया राणीचा पुतळा राणीच्या बागेत होता. सध्या तो कुठे आहे याबद्दल मतभेद आहेत. सध्या इमारतीच्या मध्यभागी असलेल्या घुमटावर प्रगतीचे प्रतीक असलेला स्त्री देवतेचा पुतळा असून तो राणीचा पुतळा आहे असा गैरसमज प्रचलित आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची वैशिष्ट्ये
जागतिक वारसा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीचे सौंदर्याला कुठेही बाधा येणार नाही अशा पद्धतीने लाकडी व धातूचे कोरीव काम केलेले कठडे बनवलेले आहेत.रेल्वे स्थानकावरील बुकिंग ऑफिस नॉर्थ विंग मध्ये आहे.या ठिकाणी इटालियन मार्बल आणि भारतातील इंडियन ब्ल्यूस्टोन टाइल्स वापरले आहेत.त्यामध्ये सोनेरी चांदण्या बसवल्यामुळे त्याचे सौंदर्य आणखी खुलले आहे.बाहेरच्या भिंतीवर वाणिज्य, कृषी, स्थापत्य,विज्ञान यांची प्रगती दर्शविणारे पुतळे बसविण्यात आलेले आहेत. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सिंहाची प्रतिमा ब्रिटिश साम्राज्याचे प्रतीक आणि वाघाची प्रतिमा भारताचे प्रतीक म्हणून बसवलेले आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुकलेच्या दृष्टीने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वारसा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे महत्व
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये रोज जवळपास तीन लाख प्रवासी येतात. या स्थानकामध्ये एकूण 18 प्लॅटफॉर्म आहेत. त्यापैकी एक ते सात प्लॅटफॉर्म मुंबईची जीवन वाहिनी असणाऱ्या लोकल ट्रेनसाठी राखून ठेवलेले आहेत. तर आठ ते अठरा क्रमांकाचे प्लॅटफॉर्म दूर अंतरावर जाणाऱ्या रेल्वेसाठी राखून ठेवलेले आहेत. भारतीय चित्रपटांचे शूटिंग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकामध्ये झालेले आहे. जय हो, स्लम डॉग मिलेनियर, रा वन या चित्रपटातील काही प्रसंगांचे चित्रीकरण या स्थानकात झाले आहे. जागतिक वारसा स्थळ असल्यामुळे या ठिकाणी जतन आणि संवर्धनाचे काम निरंतर चालू असते.मुंबई भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सर्वात व्यस्त असे ठिकाण आहे.
सी एस एम टी येथील पर्यटकांसाठी सोयी सुविधा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी अनेक सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत पर्यटकांना माहिती देण्यासाठी येथे माहिती केंद्र आहे. सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी विश्रांती कक्ष आहेत. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे स्टॉल्स आणि उपहारगृह आहेत या ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल्स आवश्यक दैनंदिन वस्तूंचे स्टॉल हस्तकला वस्तू विक्री स्टॉल आहेत.
सी एस एम टी जवळ आवर्जून भेट द्यावी अशी पर्यटन स्थळे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ चालत जाण्याच्या अंतरावर आवर्जून भेट द्यावी अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये गेटवे ऑफ इंडिया,एलिफंटा लेणी,छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय,मरीन ड्राईव्ह,क्रॉफर्ड मार्केट,जहांगीर आर्ट गॅलरी,फ्लोरा फाउंटेन या पर्यटन स्थळांचा समावेश होता.
गेटवे ऑफ इंडिया भारताचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेले अरबी समुद्र किनाऱ्यावरील ठिकाण. याची स्थापत्य शैली वैशिष्ट्यपूर्ण आहे भारतीय पारंपारिक स्थापत्यशैली तसेच गोथिक शैली आणि मुघल स्थापत्य शैलीचा प्रभाव याच्यावर आहे. प्रवेशद्वारावरील कमान 85 फूट उंचीची आहे वास्तुच्या वरील चारही कोपऱ्यांवर तिच्या मूर्ती सामर्थ्य आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून बसवलेले आहेत गेटवे ऑफ इंडियाच्या भिं तीवर इंग्रजी मराठी हिंदी आणि गुजराती भाषेमध्ये शिलालेख आहेत त्यामध्ये 1911 मध्ये पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीची माहिती दिलेली आहे.मुंबईमध्ये आलेले पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देतात. एलिफंटा लेणी घारापुरी लेणी या नावानेही प्रसिद्ध आहे. गेटवे ऑफ इंडिया पासून दहा किलोमीटर अंतरावर समुद्रामध्ये या लेणी आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय -पूर्वी या संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असे होते.इतिहास प्रेमी,संशोधक, विद्यार्थी या वस्तू संग्रहालयाला भेट देतात. मरीन ड्राईव्ह– या ठिकाणी समुद्र किनारा आहे.संध्याकाळी या भागात फिरण्याचा आनंद पर्यटक घेतात. विशेषतः या ठिकाणाहून सूर्यास्त पाहणे हे पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र असते. येथील चौपाटीवरील खाद्यपदार्थ खवय्यांचे पसंतीचे ठिकाण आहे. क्रॉफर्ड मार्केट -किरकोळ व ठोक मालाची बाजारपेठ या ठिकाणी आहे. जहांगीर आर्ट गॅलरी – या मध्ये भारतातील प्रसिद्ध चित्रकार, शिल्पी, फॅशन डिझायनर तसेच कलेच्या क्षेत्रातील कलाकार आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन या ठिकाणी भरवतात. फ्लोरा फाउंटेन – यावर रोमन पौराणिक कथेतील देव देवतांच्या मूर्ती आणि पाना फुलांचे नक्षीकाम कोरलेले असून वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे प्रेक्षणीय झाले आहे.हाजी अली दर्गा इत्यादी पर्यटन स्थळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ आहेत. या पर्यटन स्थळांना पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.
सारांश
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस एम टी या नावानेही ओळखले जाते.युनेस्कोने 2004 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला मान्यता दिली आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे स्थापत्य वैशिष्ट्यपूर्ण असून यामध्ये व्हिक्टोरियन गॉथिक,इटालियन गॉथिक आणि भारतीय अभिजात पारंपारिक स्थापत्य शैलीचा संगम पहावयास मिळतो.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ चालत जाण्याच्या अंतरावर अनेक पर्यटन स्थळे आहेत. भारताचा हा समृद्ध संस्कृतीक वारसा जतन करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
Read more about –Elephanta Caves
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus: UNESCO World Heritage Site
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus: UNESCO World Heritage Site-Chhatrapati Shivaji Maharaj Terminus in Mumbai is also known as CSMT. It is a major station of Indian Central Railway. This railway station is on the south side of Mumbai city. This railway station was inaugurated on 20th June 1887 on the occasion of the 25th anniversary of the coronation of British Empress Victoria. The construction of this railway station was completed under the guidance of British engineer Frederick William Stevens. UNESCO has recognized Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Railway Station as a World Heritage Site in 2004.
History of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus
The first train in India ran from Thane to Boribandar in 1853. During the period 1853 to 1887 Chhatrapati Shivaji Maharaj terminus station was named as Boribandar station. From 1887 to 1996 it was named Victoria Terminus. It was renamed Chhatrapati Shivaji Terminus from 1996 to 2017. The current name was changed to Chhatrapati Shivaji Maharaj Terminus from 2017.
Architecture of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus
The architecture of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus is unique heritage and features a confluence of Victorian Gothic, Italian Gothic and Indian classical traditional architectural styles. Earlier, Elphinstone College and Mumbai University buildings in Mumbai were built in this style. The main building has many towers and a dome in the middle. ‘c’ The structure of this building is like the English letter C. In 1950, the marble statue of Queen Victoria in front of the main dome was moved from there and installed in Rani Bagh, Mumbai. Until 1980, the statue of Queen Victoria was in Rani Bagh. There is disagreement as to where he is at present. At present there is a statue of a female deity symbolizing progress on the dome in the center of the building, which is widely believed to be a statue of a queen.
Features of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus has wooden and metal carved walls created by students of JJ School of Arts in a manner that does not disturb the beauty of the main building. The booking office at the railway station is in the North Wing. Bluestone tiles are used. The golden moonlits add to its beauty. The outer walls are decorated with statues depicting the progress of commerce, agriculture, architecture, science. At the main entrance of the railway station, a statue of a lion is a symbol of the British Empire and a tiger is a symbol of India. Chhatrapati Shivaji Maharaj Terminus in Mumbai is very unique in terms of historical culture and architecture heritage.
Importance of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus receives nearly three lakh passengers every day. There are total 18 platforms in this station. Platforms one to seven of them are reserved for local trains which are the lifeblood of Mumbai. Platforms eight to eighteen are reserved for long-distance trains. Many Indian films have been shot in this railway station. Some scenes of Jai Ho, Slum Dog Millionaire, Ra One have been shot in this station. Being a World Heritage Site, conservation and conservation work is ongoing at this place. As Mumbai is the financial capital of India, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus is the busiest place.
Tourist Facilities at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus
Many tourist facilities are available at the Chhatrapati Shivaji Maharaj Terminus for tourists. There are rest rooms for all types of passengers. There are various types of food stalls and restaurants, book stalls, daily essentials stalls, handicraft stalls.
Must visit Tourist Places near CSMT
There are many tourist places within walking distance of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus. Gateway of India A place on the Arabian sea coast famous as the gateway to India. Its architectural style is typical of Indian traditional architecture as well as influenced by Gothic style and Mughal architecture. Information about the visit of George V and Queen Mary to India in 1911. Tourists who come to Mumbai must visit this place. Elephanta Cave is also famous as Gharapuri Cave. These caves are located in the sea at a distance of ten kilometers from the Gateway of India. For more information the link is given below. Chhatrapati Shivaji Maharaj Museum Earlier the name of this museum was Prince of Wales Museum. History lovers, researchers, students visit this museum.
Marine Drive is the place where the beach is located. Tourists enjoy walking in this area in the evening. Especially watching the sunset from this place is a special attraction for tourists. Chowpatty is a foodie’s favorite spot, Crawford Market is a retail and thrift market. Jahangir Art Gallery houses India’s famous painters, sculptors, fashion designers and artists who exhibit their works. The Flora Fountain has sculptures of gods and goddesses from Roman mythology and carvings of leaves and flowers and is spectacular due to its unique design. Tourist places like Haji Ali Dargah are near the Chhatrapati Shivaji Maharaj Terminus. Tourists visit these tourist places in large numbers.
Summary
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus in Mumbai is also known as CSMT. Chhatrapati Shivaji Maharaj Terminus railway station has been recognized as a World Heritage Site by UNESCO in 2004. The architecture of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus is distinctive and includes Victorian Gothic, Italian Gothic and Indian Classical. A confluence of traditional architectural styles can be seen. There are many tourist spots within walking distance of Chhatrapati Shivaji Maharaj Terminus. It is our responsibility to preserve this rich cultural heritage of India.
