भारत सरकारने बुद्ध सर्किट स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत टुरिझम सुरू केले आहे. सांस्कृतिक वैविध्य आणि परंपरा असलेला देश म्हणून भारताची जगात ओळख आहे. भारतामध्ये समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बौद्ध वारसा असलेली अनेक ठिकाणे आहेत. हा समृद्ध वारसा लाभलेला देश परदेशी पर्यटकांना उपलब्ध व्हावा यासाठी बुद्ध सर्किट योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. प्राचीन काळी बौद्ध धर्माचा भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. भारतीय उपखंडातील पर्यटक मोठ्या संख्येने भारतातील बौद्ध स्थळांना भेट देतात. बुद्ध सर्किट स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून बौद्ध स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होत असल्याने या बौद्ध स्थळांना देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या लेखामध्ये बुद्ध सर्किट स्वदेश योजना अंतर्गत येणाऱ्या स्थळांची पर्यटनाच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले आहे.

बुद्ध सर्किट स्वदेश दर्शन योजनेतील स्थळे प्रामुख्याने भारतातील बिहार, उत्तर प्रदेश आणि नेपाळ मध्ये आहेत.या योजनेत लुंबिनी, कपिलवस्तू ,बोधगया, सारनाथ,कुशीनगर,राजगीर, नालंदा विद्यापीठ,श्रावस्ती आणि वैशाली या स्थळांचा समावेश होतो.
नेपाळ मधील बुद्ध सर्किट पर्यटन
लुंबिनी –Lumbini Location सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी नेपाळ येथे झाला. लुंबिनी मध्ये मायादेवी मंदिर, पवित्र उद्यान, अशोक स्तंभ, लुंबिनी वस्तू संग्रहालय, बौद्ध विहार संकुल, बोधिवृक्ष ,पीस पॅगोडा, कोरीव लेख ही स्थळे बुद्ध सर्किट स्वदेश दर्शन योजनेतील पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहेत.मायादेवी मंदिर – लुंबिनी येथील सर्वात महत्वपूर्ण ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला त्या ठिकाणी मायादेवी मंदिर बांधलेले आहे. पवित्र उद्यान -लुंबिनी येथील मायादेवी मंदिर परिसरात प्रशस्त उद्यान विकसित करण्यात आले आहे. यामध्ये बुद्धाची अनेक छोटी मोठी मंदिरे व मूर्ती बसविण्यात आले आहेत. विविध प्रकारचे वृक्ष आणि पाण्याचे कुंड यामुळे इथे येणारे पर्यटक भारावून जातात.अशोक स्तंभ– मौर्य सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर लुंबिनी येथे भेट दिली होती ;त्यावेळी अशोकाने या ठिकाणी अशोक स्तंभ उभारला होता तो स्तंभ आजही त्या ठिकाणी आहे. लुंबिनी येथील वस्तुसंग्रहालयात बौद्ध धर्म आणि लुंबिनीच्या इतिहास काळातील अनेक वस्तू शिल्प, मूर्ती व इतर अवशेष यांचे जतन करण्यात आले आहे.बुद्ध सर्किट स्वदेश दर्शन योजनेतील लुंबिनी हे महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.
कपिलवस्तू–Kapilvastu Location हे पर्यटन स्थळ नेपाळमध्ये आहे.सिद्धार्थ गौतमाचे बालपण कपिलवस्तू येथे गेले. या ठिकाणी प्राचीन काळातील अनेक इमारतींचे अवशेष आढळले आहेत.
भारतातील बुद्ध सर्किट पर्यटन
बोधगया– Bodhgaya Location बुद्ध सर्किट स्वदेश दर्शन योजनेतील बोधगया हे पर्यटन स्थळ भारताच्या बिहार राज्यात आहे.गौतम बुद्धांनी या ठिकाणी बोधिवृक्षाखाली तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. बोधगया येथे महाबोधी मंदिर बांधण्यात आले आहे. महाबोधी मंदिर आणि परिसराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. याशिवाय बोधे वृक्ष, रॉयल भूतान विहार आणि फाल्गुनदी या स्थळांना पर्यटक आवर्जून भेट देतात.
राजगीर आणि नालंदा–Rajgir and Nalanda Location ही दोन्ही पर्यटन स्थळे भारताच्या बिहार राज्यात आहेत. राजगीर आणि नालंदा विद्यापीठ बौद्ध धर्माचे प्रमुख शिक्षण केंद्र होते. राजगीर येथे गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना धार्मिक उपदेश देत असत. गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर नालंदा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. नालंदा विद्यापीठ परिसराला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने मान्यता दिलेली आहे.
वैशाली–Vaishali Location हे पर्यटन स्थळ बिहार राज्यात असून गंडक नदीच्या काठावर वसलेले आहे. या ठिकाणी गौतम बुद्धाने तीन वेळा भेट दिलेली होती. गौतम बुद्धांनी निर्वाणापूर्वी आपले शेवटचे व्याख्यान वैशाली येथे दिले होते .जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचे जन्मस्थान वैशाली जवळ आहे. जैन धर्मियांचे हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. गुप्त काळामध्ये चिनी प्रवासी फाहियान याने या स्थळाला भेट दिली होती. या शिवाय बौद्ध धर्माची दुसरी धर्म परिषद वैशाली येथे भरविण्यात आली होती. वैशाली येथे मौर्य सम्राट अशोक याचा स्तंभ, स्तूप आणि विहारांचे अवशेष जतन करण्यात आले आहेत.
सारनाथ – Sarnath Location बुद्ध सर्किट स्वदेश दर्शन योजनेतील सारनाथ हे पर्यटन स्थळ उत्तर प्रदेशातील वाराणसी जवळ आहे.ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन सारनाथ येथे दिले.गौतम बुद्धाचे धम्मचक्र प्रवर्तन सारनाथ येथून सुरू झाले.सारनाथ येथे धम्मेक स्तूप आणि वस्तू संग्रहालय पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहे. याशिवाय श्रीलंका सरकारने बांधलेले बौद्ध विहार सारनाथ येथे आहे. येथील वस्तुसंग्रहालयात सारनाथ अशोक स्तंभ ठेवण्यात आलेला आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चार सिंह असलेले स्तंभशीर्ष भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे.
कुशीनगर– Kushinagar Location बुद्ध सर्किट स्वदेश दर्शन योजनेतील कुशीनगर हे पर्यटन स्थळ उत्तर प्रदेश मध्ये आहे. कुशीनगर येथे गौतम बुद्धाचे महानिर्वाण झाले. येथील निर्वाण स्तूप आणि रामभर स्तूप परिसराला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.
श्रावस्ती– Shravasti Location हे पर्यटन स्थळ उत्तर प्रदेश मध्ये आहे. गौतम बुद्धाने 25 वर्षे श्रावस्ती येथे वास्तव्य केले होते. येथील वास्तव्यामध्ये गौतम बुद्धांनी धर्मसंघातील भिक्खूंना अनेक व्याख्याने दिली. या ठिकाणी बौद्ध वारसा स्तूप आणि विहार यांचे जतन करण्यात आले आहे. येथील संपूर्ण परिसराचा बुद्ध सर्किट संदेश योजनेअंतर्गत पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात आला आहे.
बुद्ध सर्किट पर्यटन मार्गदर्शक
बुद्ध सर्किट स्वदेश दर्शन योजनेमुळे पर्यटकांना गौतम बुद्धाच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना ज्या ठिकाणी घडल्या ती सर्व ठिकाणे; तसेच बौद्ध धर्म तत्त्वज्ञान ,गौतम बुद्धाची शिकवण याची माहिती मिळते.ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक आणि संस्कृतीक दृष्ट्या समृद्ध वारसा स्थळे आहेत. त्यामुळे बौद्ध धर्माचा भारतीय संस्कृतीवर पडलेला प्रभाव याची जाणीव पर्यटकांना होते. बुद्ध सर्किट योजनेतील मार्गावर महत्त्वाचे बौद्ध स्तूप, विहार ,नालंदा विद्यापीठ, महाबोधी मंदिर, सारनाथ येथील धम्मेक स्तूप आणि लुंबिनी येथील बुद्धाचे जन्मस्थळ पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहेत. या स्थळांवर आत्मिक शांतीसाठी विपश्यना केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. पूर्व आशिया आणि आग्नेय आशिया मधील पर्यटक मोठ्या प्रमाणात भारतातील बौद्ध स्थळांना भेट देतात. थाई,जपानी, व्हिएतनामी आणि चिनी भाषेतून माहिती देणारे प्रशिक्षित गाईड या सर्व स्थळांवर उपलब्ध आहेत.विमानाने प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी पटना बिहार आणि काठमांडू नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी पटना रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे ची सोय करण्यात आलेली आहे.
सारांश
भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश बौद्ध धर्माचे आध्यात्मिक केंद्र मानले जातात. येथे जतन झालेली हजारो वर्षांची परंपरा आजही शांतता, करुणा आणि प्रबोधनाचा संदेश देत राहिली आहे. बुद्ध सर्किट ही पवित्र तीर्थयात्रा मार्गिका गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांना जोडते — जन्म, ज्ञानप्राप्ती, धर्मदेशना आणि महापरिनिर्वाण — ज्यामुळे प्रवाशांना एक गहन आध्यात्मिक अनुभव मिळतो.
या यात्रेची सुरुवात नेपाळमधील लुंबिनी येथे होते, जिथे राजकुमार सिद्धार्थाचा जन्म झाला. येथे मायादेवी मंदिर आणि पवित्र कुंड या स्थळांना विशेष महत्त्व आहे. पुढे बिहारमधील बोधगया हे ठिकाण आहे, जिथे बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. येथे असलेले महाबोधी मंदिर संकुल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे आणि ते करुणा व ज्ञानाचे प्रतीक आहे.
उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे बुद्धांनी प्रथम धर्मचक्र प्रवर्तन केले. येथील धमेक स्तूप आणि मूलगंध कुटी विहार हे त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून देतात. त्यानंतरचे कुशीनगर हे ठिकाण बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचे स्थान म्हणून ओळखले जाते, जिथे भक्त आत्मशांतीसाठी येतात.
इतर महत्त्वाची स्थळे म्हणजे राजगीर आणि नालंदा, जे प्राचीन बौद्ध शिक्षणाचे केंद्र होते, तसेच मध्य प्रदेशातील सांची, जी आपल्या अप्रतिम स्तूप आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. ही सर्व ठिकाणे भारत-नेपाळमधील अध्यात्मिक व ऐतिहासिक पर्यटनाचे अनोखे जाळे तयार करतात.
आज बुद्ध सर्किट पर्यटन उपक्रम भारत सरकारच्या प्रयत्नांनी या प्राचीन मार्गिकेला नवसंजीवनी देत आहे. ही यात्रा फक्त ऐतिहासिक स्मारकांची नव्हे, तर बुद्धांच्या शिकवणीतील शांतता, सहिष्णुता आणि प्रबोधनाचा अविस्मरणीय अनुभव देते.
Buddhist Heritage Sites in India
Government of India has started tourism under the Buddha Circuit Swadesh Darshan scheme. India is known in the world as a country of cultural diversity and tradition. India has many Buddhist places with rich cultural and spiritual heritage. The Buddha Circuit scheme has been launched to make this rich heritage country accessible to foreign tourists. It includes important places related to the life of Gautama Buddha. In ancient times, Buddhism spread widely in the Indian subcontinent. A large number of tourists from the Indian subcontinent visit Buddhist sites in India. Due to the development of Buddhist places in terms of tourism through Buddha Circuit Swadesh Darshan Yojana, a large number of tourists from home and abroad are visiting these Buddhist places. In this article, the places that come under Buddha Circuit Swadesh Yojana are guided in terms of tourism.
Sightseeing Buddha Circuit Tour
The sites of Buddha Circuit Swadesh Darshan Tourism are mainly located in Bihar, Uttar Pradesh and Nepal in India. The scheme includes Lumbini, Kapilvastu, Bodh Gaya, Sarnath, Kushinagar, Rajgir, Nalanda University, Sravasti and Vaishali.
Buddha Circuit Tourism in Nepal
Lumbini – Siddhartha Gautama was born in Lumbini Nepal. Mayadevi Temple, Sacred Garden, Ashoka Pillar, Lumbini Artifacts Museum, Buddhist Vihara Complex, Bodhi Tree, Peace Pagoda, Carvings are the major tourist attractions in Lumbini.In the Buddha Circuit Scheme Lumbini is major destination.Mayadevi Temple – The most important place in Lumbini is the place where Gautama Buddha was born. Mayadevi temple is built at the place.Sacred Garden at Lumbini- A spacious garden has been developed in the Mayadevi Temple area of Lumbini. Many small temples and idols of Buddha have been installed in this. Various types of trees and water tanks amaze the tourists coming here.Ashoka Pillar– The Mauryan Emperor Ashoka visited Lumbini after he converted to Buddhism; At that time, Ashoka erected the Ashoka Pillar at this place which is still there today. The museum preserves many objects of Buddhism and the history of Lumbini, sculptures, idols and other relics.
Kapilvastu– This place is located in Nepal. Siddhartha Gautama spent his childhood in Kapilvastu. The remains of many ancient buildings have been found in this place.
Buddha Circuit Tourism in India
Bodh Gaya is a place in the Bodh Gaya-Buddha circuit scheme located in the state of Bihar, India. After doing penance under the Bodhi tree, Gautama Buddha attained enlightenment at this place. Mahabodhi Temple is built at Bodh Gaya. The Mahabodhi Temple and its surroundings have been recognized as a World Heritage Site by UNESCO. Apart from this, Bodhe Tree, Royal Bhutan Vihar and Falgundi are must-visit places for tourists.
Rajgir and Nalanda- Both these tourist places are located in the Indian state of Bihar. Rajgir and Nalanda University were major learning centers of Buddhism. Gautama Buddha used to give religious sermons to his followers at Rajgir. Nalanda University was established after the nirvana of Gautama Buddha. The Nalanda University campus has been recognized as a World Heritage Site by UNESCO.
Vaishali– This place is located in the state of Bihar and is situated on the banks of river Gandak. Gautama Buddha visited this place three times. Gautama Buddha gave his last lecture before Nirvana at Vaishali. The birthplace of Vardhaman Mahavira, the last Tirthankara of Jainism, is near Vaishali. It is a major pilgrimage site for Jains. The site was visited by the Chinese traveler Fahian during the Gupta period. Apart from this, the second Dharma Parishad of Buddhism was held at Vaishali. Remains of Maurya emperor Ashoka’s pillars, stupas and viharas have been preserved at Vaishali.
Sarnath – Sarnath is a place near Varanasi in Uttar Pradesh. After attaining enlightenment, Gautama Buddha gave his first sermon at Sarnath. Gautama Buddha’s practice of Dhamma Chakra started from Sarnath. Dhammak Stupa and Artifacts Museum at Sarnath is a special attraction for tourists. Apart from this, there is a Buddhist monastery built by the Sri Lankan government at Sarnath. The Sarnath Ashoka pillar is kept in the museum here. The four lions on the Ashoka pillar at Sarnath is the national emblem of India.
Kushinagar– In the Buddha circuit scheme is located in Uttar Pradesh. Mahanirvana of Gautama Buddha took place at Kushinagar. Nirvana Stupa and Rambhar Stupa are visited by tourists in large numbers. Both Rajgir and Nalanda are located in the Indian state of Bihar. Rajgir and Nalanda University were major learning centers of Buddhism. Gautama Buddha used to give religious sermons to his followers at Rajgir. Nalanda University was established after the nirvana of Gautama Buddha. The Nalanda University campus has been recognized as a World Heritage Site by UNESCO.
Sravasti– This place is in Uttar Pradesh. Gautama Buddha lived in Sravasti for 25 years. During his stay here, Gautama Buddha gave many lectures to the bhikkhus of the Dharma Sangha. Buddhist Stupas and Viharas have been preserved at this place. The entire area here has been developed for tourism.
Buddha Circuit Tourism Guide
Buddha Circuit Swadesh Darshan Yojana allows tourists to visit all the places where important events in the life of Gautama Buddha took place; Also one gets information about Buddhism philosophy, teachings of Gautama Buddha. All these places are historical and culturally rich heritage sites. Therefore, tourists are aware of the influence of Buddhism on Indian culture. Important Buddhist Stupas, Viharas, Nalanda University, Mahabodhi Temple, Dhammek Stupa at Sarnath and Birthplace of Buddha at Lumbini are special tourist attractions on the route in the Buddha Circuit scheme. Vipassana centers have been established at these places for spiritual peace. Tourists from East Asia and Southeast Asia visit Buddhist sites in India in large numbers give Trained guides providing information in Thai, Japanese, Vietnamese and Chinese are available at all sites.For tourists traveling by air, there are international airports at Patna Bihar and Kathmandu Nepal. A special train has been arranged from Patna railway station to travel by train.
Summary
Both India and Nepal are considered the spiritual centers of Buddhism. The thousands of years of tradition preserved here continue to convey the message of peace, compassion and enlightenment. The Buddha Circuit, a sacred pilgrimage route, connects the important stages of Gautama Buddha’s life — birth, enlightenment, sermons and Mahaparinirvana — giving travelers a profound spiritual experience.
The pilgrimage begins in Lumbini in Nepal, where Prince Siddhartha was born. The Mayadevi Temple and the sacred pond are of particular importance here. Next is Bodh Gaya in Bihar, where the Buddha attained enlightenment under the Bodhi tree. The Mahabodhi Temple complex located here is included in the UNESCO World Heritage Sites and is a symbol of compassion and wisdom.
The Buddha first turned the Dharmachakra at Sarnath in Uttar Pradesh. The Dhamek Stupa and the Mulgandh Kuti Vihar here commemorate that historic moment. The subsequent Kushinagar is known as the place of Buddha’s Mahaparinirvana, where devotees come for spiritual peace.
Other important places are Rajgir and Nalanda, which were centers of ancient Buddhist learning, as well as Sanchi in Madhya Pradesh, which is famous for its magnificent stupas and sculptures. All these places form a unique network of spiritual and historical tourism in India-Nepal.
Today, the Buddha Circuit Tourism Initiative is reviving this ancient route through the efforts of the Government of India. This journey offers an unforgettable experience of not only historical monuments, but also the peace, tolerance and enlightenment of the Buddha’s teachings.

Leave a comment