येथील सुवर्ण किनारे, लाटांचा मंद आवाज आणि स्थानिक संस्कृती पर्यटकांना मोहित करतात. दरवर्षी होणारा नृत्य महोत्सव, स्मारकांच्या सान्निध्यात उघड्या आकाशाखाली पार पडतो, आणि भूतकाळाला वर्तमानाशी जोडतो.महाबलीपूरम हे इतिहासप्रेमी, कला-रसिक आणि निसर्गप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्यटन स्थळ आहे, जिथे वेळ जणू थांबतो आणि द शैल स्थापत्य व समुद्राची शाश्वत सुंदरता अनुभवायला मिळते. महाबलीपुरम येथील वारसा पर्यटन स्थळे... Continue Reading →
कोणार्क सूर्य मंदिर: सांस्कृतिक वारसा स्थळ|Konark Sun Temple: Cultural Heritage Destination
कोणार्क येथील सूर्य मंदिर हे भारताच्या स्थापत्य वैभवाचे आणि सांस्कृतिक वारशाचे भव्य उदाहरण आहे. ओडिशामध्ये वसलेले हे मंदिर इ.स. १३व्या शतकात पूर्व गंग राजवंशातील राजा नरसिंहदेव प्रथम यांनी बांधले. सूर्यदेवाला अर्पण केलेले हे मंदिर रथाच्या अद्वितीय आकारात उभारले गेले असून त्याला बारा सुंदर कोरीव दगडी चाकं आणि सात घोडे आहेत, जे सूर्याच्या आकाशातील प्रवासाचे प्रतीक... Continue Reading →
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले|Forts of Chhatrapati Shivaji Maharaj
मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणजे काय? भारतातील मराठा लष्करी लँडस्केप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याने उभारलेली किल्ल्यांची रणनीतिक साखळी होय. महाराष्ट्रातील डोंगराळ भाग, सह्याद्रीच्या कड्यावर आणि किनारपट्टीवर पसरलेले हे किल्ले – जसे रायगड, राजगड, प्रतापगड – उत्कृष्ट डोंगरी वास्तुकला, बचावात्मक रचना आणि गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचे दर्शन घडवतात. १७ व्या ते १९व्या शतकादरम्यान उभारले गेलेले... Continue Reading →
त्रिरश्मी बौदध लेणी । Trirashmi Buddhist Caves
त्रिरश्मी पांडवलेणी महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर त्रिरश्मी डोंगरामध्ये आहेत. प्राचीन भारतातील सातवाहन, कलचुरी आणि वाकाटक या घराण्यातील राजांनी ही लेणी खोदलेली आहेत. प्राचीन कल्याण ते नाशिक या व्यापारी मार्गावर ही लेणी आहेत. जवळपास 250 पायऱ्या चढून गेल्यानंतर पांडवलेणी दृष्टीपथात येतात.पांडवलेणी येथे एकूण 24 बौद्ध लेणी आहेत.येथील लेण्यांमध्ये गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या प्रतिमा... Continue Reading →
सिंधू संस्कृती वारसा: पुरातत्त्वीय स्थळे |Indus Valley Civilization Heritage : Archaeological Sites
हडप्पा संस्कृतीची स्थळे पुरातत्त्वीय पर्यटनाच्या दृष्टीने अत्त्यंत महत्त्वाची आहेत. सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती, ब्राँझ युगीन संस्कृती या नावानेही ओळखले जाते. सिंधू संस्कृती मधील लोकांनी जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केली होती. भारतामध्ये अश्मयुगानंतर मानवी प्रगती मधील सर्वात महत्वपूर्ण कालखंड म्हणजे ताम्रपाषाण युग होय. धातु युगाच्या प्रारंभी मानवाने तांब्यापासून विविध अलंकार व उपकरणे बनविले. ज्या काळात मानवाने... Continue Reading →
राजस्थान वारसा : पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण|Rajasthan Heritage: Places that tourists must visit
भारताचे सर्वात मोठे राज्य असलेले राजस्थान हे इतिहास, संस्कृती, परंपरा, निसर्गसौंदर्य आणि राजेशाही वैभव यांचा सुंदर संगम आहे. “राजांची भूमी” म्हणून ओळखले जाणारे राजस्थान आपल्या भव्य किल्ल्यांसाठी, आलिशान महालांसाठी, रंगीबेरंगी सण-उत्सवांसाठी आणि अजिंक्य राजपुताना शौर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या वाळवंटी भूमीतील प्रत्येक शहर धैर्य, प्रेमकथा आणि कलात्मक वैभवाच्या कथा सांगते, त्यामुळेच राजस्थान हे भारतातील सर्वात... Continue Reading →
विद्यापीठ शिक्षण पद्धती | Univrsity Education System
विद्यापीठ शिक्षण पद्धती प्राचीन भारतातील शैक्षणिक उत्क्रांतीमधील महत्वपूर्ण टप्पा मानला जातो. भारतात आलेल्या चिनी प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून तसेच प्राचीन विद्यापीठे ज्या ठिकाणी अस्तित्वात होती त्याठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननातून मिळालेल्या अवशेषांवरून प्राचीन भारतातील प्रमुख विद्यापीठांची माहिती मिळते. उत्तर भारतामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी आणि काशी ही विद्यापीठे विशेष प्रसिद्ध होती. तर दक्षिण भारतात मंदिरामध्ये शिक्षण देण्याचे... Continue Reading →
अजिंठा लेणी:चित्रकला, शिल्पकला आणि वास्तुकलेचा समृद्ध वारसा|Ajanta Caves: A rich heritage of paintings,sculptures and architecture
अजिंठा लेणी प्रामुख्याने चित्रकलेसाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील चित्रकलेवर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे; असे असले तरी कलाकारांनी मानवी जीवनातील इतर अंगांचाही चित्रकलेमध्ये समावेश केला आहे. विशेषतः गौतम बुद्धाचे विविध रूपातील चित्रण या लेण्यांमध्ये पहावयास मिळते.मानवी भावनांच्या अभिव्यक्तीचे एक साधन म्हणून प्राचीन भारतातील कलाकारांनी चित्रकलेचा उपयोग केला. भाषेचा विकास होण्यापूर्वी मानव सर्वप्रथम चित्रकलेकडे वळला असावा.... Continue Reading →
कैलास मंदिर एलोरा : जागतिक वारसा एक चमत्कार|Kailash Temple Ellora : A Marvel of World Heritage
महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात वसलेले कैलास मंदिर हे भारताच्या प्राचीन शिल्पकलेचे आणि अध्यात्मिक समर्पणाचे अद्वितीय उदाहरण आहे. संपूर्ण मंदिर एकाच खडकातून कोरले गेले असून, हे आश्चर्यकारक वास्तुशिल्प एलोरा लेण्यांचा एक भाग आहे – जो जगातील सर्वात मोठ्या शिलालेखित मंदिर समूहांपैकी एक आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सामाविष्ट आहे. आठव्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण... Continue Reading →
अहिल्यादेवी होळकर|Ahilyadevi Holkar
अहिल्यादेवींचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी यथे 31 मे 1725 रोजी झाला.माणकोजी शिंदे आणि सुशीला देवी हे त्यांचे माता पिता होते.त्यांचा विवाह इंदोरच्या खंडेराव होळकर यांच्याबरोबर झाला.त्यांना मालेराव आणि मुक्ताबाई हि दोन अपत्ये होती.मल्हारराव होळकर हे त्यांचे सासरे होते.पती खंडेराव होळकर फारसे कर्तबगार नसल्यामुळे मल्हाररावानी अहिल्यादेवी यांना राज्यकारभार,युद्धातील डावपेच यांचे शिक्षण दिले.पती खंडेराव होळकर यांच्या अकाली निधनानंतर मल्हारराव होळकरांनी तत्कालीन... Continue Reading →

You must be logged in to post a comment.