आग्रा येथील युनेस्को वारसा स्थळे|UNESCO HERITAGE SITES IN AGRA

ताजमहल-आग्रा किल्ला-फतेहपूर सिकरी

आग्रा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुकलेच्या दृष्टीने संपन्न शहर आहे. देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात जागतिक वारसा पाहण्यासाठी आग्रा येथे जातात. याशिवाय जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहल, ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आग्रा किल्ला आणि फतेहपुर सिक्री येथील बुलंद दरवाजा आणि पंच महल ही स्थळे आग्रा येथील पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहेत.या तीनही स्थळांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळे म्हणून मान्यता दिलेली आहे.

Tajmahal Agra

ताजमहल

ताजमहल आग्रा येथील युनेस्को वारसा स्थळ आहे.आग्रा येथे मुघल बादशहा शाहजहानने 1631 ते 1648 या काळात त्याची पत्नी मुमताज महल हिच्या स्मृती साठी ताजमहल ची निर्मिती केली. अद्वितीय वास्तू कला हे ताजमहल चे खास वैशिष्ट्य आहे. ताजमहल बांधून पूर्ण होण्यासाठी जवळपास 20 वर्षे लागली. शेकडो कुशल कारागिरांनी अतिशय परिश्रमाने ही वास्तू बांधली आहे. प्रत्यक्ष ताजमहल पाहताना भव्य संगमरवरी वास्तु पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात. ताजमहल यमुना नदीच्या काठावर बांधलेले आहे.मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला उद्यान मध्यभागी कारंजे केलेले आहेत. यासाठी यमुना नदीच्या पाण्याचा कुशलतेने उपयोग केला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर ताजमहलचे सौंदर्य पर्यटकांना प्रभावित करते. ताजमहलच्या प्रांगणात एक मस्जिद आणि अतिथी गृह या वास्तू आहेत. दोन्हीही वास्तू आणि प्रवेशद्वार बांधण्यासाठी लाल रंगाच्या दगडाचा वापर केला आहे.

Click Here Tajmahal Agra Location

ताजमहलची वैशिष्ट्ये – ताजमहल ची मुख्य वास्तू  हस्ती दंती रंगाच्या संगमरवरी दगडांचा वापर करून बांधलेली आहे. मुख्य वास्तूच्या मध्यभागी मोठा घुमट आणि चार कोपऱ्यांवर उंच मनोरे बांधलेले आहेत. ताजमहल मध्ये मुघल बादशहा शहाजहान आणि मुमताज  महल यांच्या कबरी आहेत. मुख्य वास्तूच्या प्रवेशद्वारावर अरबी भाषेत आयात कोरलेले आहेत.बाह्य भिंतीवर पाने, फुले , वेली ,जाळीदार नक्षीकाम कोरलेले आहे. भारतीय आणि पर्शियन स्थापत्य कलेचा अद्वितीय संगम ताजमहल मध्ये पहावयास मिळतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ताजमहल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. विशेषतः सूर्योदयाच्या वेळी सूर्याची सोनेरी किरणे ताजमहलवर पडतात ते सौंदर्य पाहणे आणि अनुभवणे अवर्णनीय आहे.सन 1983 मध्ये युनेस्कोने ताजमहल ला जागतिक वारसा स्थळ मान्यता दिली आहे.सन 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या सात आश्चर्यांमध्ये सर्वात लोकप्रिय स्थळांची स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये ताजमहल ला प्रथम क्रमांकाची पसंती मिळाली होती. ताजमहल चा इतिहास आणि वास्तुकला याबाबतीत अनेक मतप्रवाह आहेत. असे असले तरी ताजमहल जगभरातील पर्यटकांचे भारतातील सर्वात लोकप्रिय वारसा स्थळ आहे.दरवर्षी सात ते आठ लाख पर्यटक ताजमहल ला भेट देतात.

Tajmahal Front View

लाल किल्ला(आग्रा फोर्ट)

लाल किल्ला आग्रा येथील युनेस्को वारसा स्थळ आहे.आग्रा येथील लाल किल्ला भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून लाल किल्ल्याला मान्यता दिली आहे. संपूर्ण किल्ला लाल रंगाच्या दगडांनी बांधलेला असल्यामुळे लाल किल्ला याच नावाने ओळखला जातो.लाल किल्ल्याला भक्कम दुहेरी तटबंदी आहे.किल्ल्यामध्ये दिवाण ई आम, दिवाण ई खास, जहांगीर महल या प्रमुख इमारतींसह राज परिवारातील लोकांना राहण्यासाठी महाल तसेच प्रशासकीय इमारती बांधलेल्या आहेत.शीश महाल-या महालामध्ये भिंतीवर आणि छतावर लहान आकाराचे आरसे बसवलेले आहेत. राजा आणि राणी यांच्यासाठी हा खाजगी महाल बांधलेला आहे. खास महाल -राज परिवारातील लोकांसाठी खास महाल बांधलेला आहे. मोती मस्जिद- पांढऱ्या  संगमरवरी दगडापासून ही मस्जिद बांधलेली आहे.नगीना मस्जिद-राज परिवारातील स्त्रियांसाठी ही मस्जिद बांधलेली आहे. लाल किल्ल्याचे मुख्य प्रवेश द्वार लाहोर गेट या नावाने ओळखले जाते.अलीकडच्या काळात लाल किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे.

Click Here Red Fort Agra Location

Agra Fort
Agra Fort

ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आग्रा किल्ला– छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या पुरंदर येथील तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबला भेटण्यासाठी आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये गेले होते. त्यावेळी विश्वासघाताने औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेत ठेवले. पुढे मोठ्या शिताफीने शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली. हा प्रसंग लाल किल्ल्यातील दिवाण ई आम  (सर्वसामान्यांसाठीचा दरबार हॉल) मध्ये घडला होता. प्रेरणा देणाऱ्या इतिहासाचे स्मरण करण्यासाठी लाल किल्ल्याला भेट देणारे पर्यटक आवर्जून दिवाण ई आम ला भेट देतात. लाल किल्ल्यातील दुसरी महत्त्वाची ऐतिहासिक घटना म्हणजे औरंगजेबने मुघल सत्ता काबीज केल्यानंतर बादशहा शहाजहानला आग्रा येथील याच लाल किल्ल्यात ठेवले होते. लाल किल्ल्यातील ज्या महालात शाहजहानला ठेवले होते त्याला मुसम्मन बुरुज म्हणतात. या ठिकाणाहून ताजमहल दृष्टीस पडतो.ताजमहलकडे पहात मुघल बादशहा शहाजहानने आपला अंतिम श्वास आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये घेतला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Agra
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Agra

फतेहपुर सिकरी

फतेहपुर सिकरी आग्रा येथील युनेस्को वारसा स्थळ आहे. आग्रा शहरापासून 36 कि.मी.अंतरावर फतेहपुर सिक्री हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले स्थळ आहे. या ठिकाणी मुघल स्थापत्यशैलीमध्ये बांधलेल्या अनेक इमारती पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहे.मुघल बादशाह अकबर याने या शहराची निर्मिती केली. काही वर्षे फतेहपूर सिकरी मुघल साम्राज्याची राजधानी चे शहर होते. बुलंद दरवाजा– गुजरात वर विजय मिळवल्यानंतर मुघल बादशहा अकबर याने फतेहपुर सिक्री मध्ये हा बुलंद दरवाजा बांधला. याची उंची 54 मीटर पासून त्यावरील नक्षीकाम आणि कोरीव लेख प्रेक्षणीय आहे.जामा मस्जिद-भारतातील ही एक मोठी मस्जिद आहे .यामध्ये लाल रंगाचा दगड आणि संगमरवरी  दगड यांचा कुशलतेने वापर केला आहे. प्रशस्त प्रांगणात मोठ्या  आकाराचे प्रार्थना स्थळ यामध्ये आहे. सुफी संत सलीम चिस्ती दर्गा-जामा मस्जिद मध्येच हा दर्गा आहे.सुफी संत सलीम चिस्ती मुघल बादशाह अकबर यांचे गुरु होते. बादशहा अकबर यांनी त्यांच्या नावावरूनच आपल्या मुलाचे नाव सलीम असे ठेवले होते. सलीम-अनारकली यांची प्रेम कहाणी याच फतेहपुर सिकरी मध्ये घडली होती. त्यासंबंधी अनेक दंतकथा या ठिकाणी प्रचलित आहेत.

Click Here Fatehpur Sikri Agra Location

Buland Darwaja Fatehpur Sikri
Buland Darwaja Fatehpur Sikri

दिवाण इ खास– यामध्ये प्रतिष्ठित लोकांचा दरबार भरविला जातो.बादशाह अकबराचे मयूरासन याच ठिकाणी होते.दिवाण ई आम-(सर्वसामान्यांसाठीचा दरबार हॉल) यामध्ये बादशाह अकबर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवित असे.यामध्ये नक्षीकाम केलेले अनेक स्तंभ आहेत.पंचमहल– फतेहपुर सिक्री येथील ही पाच मजली इमारत असून या इमारतीचा खालचा मजला मोठ्या आकाराचा असून वरचे मजले खालच्या मजल्या पेक्षा लहान आकाराचे आहेत. हिरन मिनार-बादशाह अकबराने आपला लाडका हत्ती हिरन याच्या स्मरणार्थ हा मनोरा बांधलेला आहे. बिरबलचे घर -बादशाह अकबराच्या नवरत्नांपैकी एक रत्न म्हणून चतुर बिरबल याचा समावेश होतो. इतरही काही मंत्र्यांची घरे या परिसरात आहेत. जोधा महल -मुघल स्थापत्य आणि राजपूत स्थापत्य शैलीचा वापर करून ही इमारत बांधलेली आहे. यावर फ्रेस्को पद्धतीने आकर्षक नक्षीकाम केल्यामुळे ही वास्तू वैशिष्ट्यपूर्ण व प्रेक्षणीय झाली आहे. इबादत खाना – या सभागृहात विविध धर्मातील विद्वान व विचारवंत धर्म आणि तत्वज्ञान यावर चर्चा,वाद विवाद करीत असत.यावरून बादशहा अकबराचे धार्मिक धोरण स्पष्ट होते.

आग्रा मधील पर्यटक सुविधा

आग्रा येथील ताजमहल,लाल किल्ला आणि फतेहपुर सिक्री येथे पर्यटकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.ही तीनही स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये असल्यामुळे देश विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येतात.पर्यटन  स्थळांमध्ये    प्रवेश करण्यासाठी तिकीट आकारले जाते.ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष तिकीट उपलब्ध आहे.विविध भाषेतून या स्थळांचा इतिहास तसेच वास्तू कला यांची माहिती देणारे मार्गदर्शक या ठिकाणी  आहेत.तसेच ऑडिओ गाईडची सोय त्या ठिकाणी आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार,पुरातत्व विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून पर्यटकांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत.आग्रा येथे पर्यटकांसाठी उत्तम दर्जाचे हॉटेल्स आणि निवास व्यवस्था आहे.

सारांश

आग्रा सांस्कृतिक आणि वास्तुकलेच्या दृष्टीने संपन्न वारसा शहर आहे. देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात जागतिक वारसा पाहण्यासाठी आग्रा येथे जातात. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची सोनेरी किरणे ताजमहलवर पडतात ते सौंदर्य पाहणे आणि अनुभवणे अवर्णनीय आहे. आग्रा येथील लाल किल्ला भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून लाल किल्ल्याला मान्यता दिली आहे. फतेहपुर सिक्री 1986 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले स्थळ आहे. या ठिकाणी मुघल स्थापत्यशैलीमध्ये बांधलेल्या अनेक इमारती पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहे. पर्यटकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.

UNESCO HERITAGE SITES IN AGRA

Tajmahal-Agra Fort-Fatehpur Sikri

Agra is a historically, culturally and architecturally rich city in the state of Uttar Pradesh, India. A large number of tourists from all over the world visit Agra to see the world’s heritage. Apart from this, the Taj Mahal, one of the Seven Wonders of the World, the historically very important Red Fort and the Buland Darwaza and Panch Mahal at Fatehpur Sikri are the special attractions of Agra. All these three places have been recognized as World Heritage Sites by UNESCO.

TAJ MAHAL

Tajmahal is a UNESCO heritage site in Agra.The Tajmahal was built in Agra by the Mughal Emperor Shah Jahan between 1631 and 1648 in memory of his wife Mumtaz Mahal. Unique architecture is a special feature of Taj Mahal. Taj Mahal took almost 20 years to complete. Hundreds of skilled craftsmen have built this vastu with great effort. While seeing the actual Taj Mahal, tourists are amazed to see the magnificent marble structure. The Taj Mahal is built on the banks of the river Yamuna. After entering through the main entrance, the garden is surrounded by fountains on both sides. For this, the water of Yamuna river has been used skillfully. In all this background, the beauty of Taj Mahal impresses the tourists. The Taj Mahal has a mosque and a guest house in its courtyard. Red colored stone has been used to build both the vastu and the entrance.

Features of TAJ MAHAL

The main structure of Taj Mahal is built using hasti-colored marble stones. There is a large dome in the center of the main structure and tall towers at the four corners. The Taj Mahal houses the tombs of Mughal emperors Shah Jahan and Mumtaz Mahal. The entrance to the main building has inscriptions in Arabic. The outer walls are carved with leaves, flowers, vines, and lattice carvings. A unique fusion of Indian and Persian architecture can be seen in the Taj Mahal. Tourists flock to see the Taj Mahal at sunrise and sunset. Especially at sunrise, seeing and experiencing the beauty of the golden rays of the sun falling on the Taj Mahal is indescribable. In 1983, UNESCO recognized the Taj Mahal as a World Heritage Site. In this Taj Mahal got the first choice. There are many opinions regarding the history and architecture of the Taj Mahal. However, Taj Mahal is the most popular heritage site in India for tourists from all over the world. Seven to eight lakh tourists visit Taj Mahal every year.

AGRA Fort(Red Fort)

Red Fort is a UNESCO heritage site in Agra.The Red Fort in Agra is a very important fort in the medieval history of India. In 1983, UNESCO recognized the Red Fort as a World Heritage Site. The Red Fort is known by the same name as the entire fort is built of red colored stones. The red fort has strong double fortifications. The fort has major buildings such as Diwan e Aam, Diwan e Khas, Jahangir Mahal and palaces for the residence of the royal family as well as administrative buildings. The palace has small size mirrors installed on the walls and ceiling. This private palace is built for the king and queen. A special palace is built for the people of the royal family. Moti Masjid- This masjid is built from white marble stone. Nagina Masjid- This masjid is built for women of Raj family. The main entrance of the Red Fort is known as Lahore Gate. In recent times, a magnificent equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj has been installed in front of the main entrance of the Red Fort.

Agra Fort witnessing Historical Events

Chhatrapati Shivaji Maharaj went to the Agra Fort in Agra to meet Aurangzeb as per the Treaty of Purandar between Chhatrapati Shivaji Maharaj and Mirzaraja Jai Singh. At that time, Aurangzeb imprisoned Chhatrapati Shivaji Maharaj by treachery. Later Shivaji Maharaj got rid of himself with great help. This event took place in the Diwan e Aam (Durbar Hall for Commoners) in the Red Fort. Tourists visiting Agra Fort must visit Diwan e Aam to commemorate its inspiring history. Another important historical event is that after Aurangzeb captured Mughal power, Emperor Shah Jahan was kept in this Red Fort at Agra. The palace in Agra Fort where Shah Jahan was kept is called Musamman Buruj. The Taj Mahal can be seen from this place. Mughal Emperor Shah Jahan breathed his last in this Agra Fort while looking at the Taj Mahal.

FATEHPUR SIKRI

Fatehpur Sikri is a UNESCO World Heritage Site at a distance of 36 km from Agra city. Many buildings built in the Mughal architectural style are a special attraction for tourists in this place. Mughal emperor Akbar built this city. Fatehpur Sikri was the capital city of Mughal Empire for some years. Buland Darwaza– Mughal Emperor Akbar built this Buland Darwaza in Fatehpur Sikri after conquering Gujarat. From its height of 54 meters, the carvings and carvings on it are spectacular. Jama Masjid is one of the largest mosques in India. It has a large size prayer hall in a spacious courtyard. Sufi Saint Salim Chisti Dargah-This dargah is located inside the Jama Masjid-Sufi Saint Salim Chisti was the Guru of Mughal Emperor Akbar. Emperor Akbar named his son Salim after him.love story of Salim-Anarkali was took place in Fatehpur Sikri. Many legends related to it are prevalent in this place.

Diwan e Khas– This is where the court of dignitaries is held at Fatehpur Sikri.Emperor Akbar’s Mayurasan (Royal Throne)was at this place. Diwan e Aam (Durbar Hall for Commoners) In this, Emperor Akbar used to solve the problems of commoners. It has many carved columns. Panchmahal– This five storied in Fatehpur Sikri There is a building and the lower floor of this building is large in size and the upper floors are smaller in size than the lower floor. Hiran Minar– This minaret was built by Emperor Akbar in memory of his beloved elephant Hiran. Birbal’s House – Chatur Birbal is included as one of the Navratnas of Emperor Akbar. Some other ministers’ houses are also in this area. Jodha Mahal – This building is built using Mughal architecture and Rajput architectural style. The attractive fresco carving on it has made this vastu unique and spectacular. Ibadat Khana – Scholars and intellectuals of various religions used to discuss and argue about religion and philosophy in this hall. This explains the religious policy of Emperor Akbar.

Tourist Facilities in Agra

As all these three places are in the list of UNESCO World Heritage Sites, a large number of tourists visit this place from the country and abroad have all the necessary facilities for tourists.Tickets are charged to enter the tourist places. Direct tickets are available. There are guides who provide information about the history of these places and the art of architecture in different languages. Also, the facility of an audio guide is available there. The Central Government, State Government, Department of Archeology and Department of Tourism have provided necessary facilities for the tourists through coordination. Agra has good quality hotels and accommodation for tourists.

Summary

The Taj Mahal, Agra Fort and Fatehpur Sikri in Agra are all three sites recognized as World Heritage Sites by UNESCO. Agra is a culturally and architecturally rich heritage city. A large number of tourists from all over the world visit Agra to see the world heritage. Seeing and experiencing the beauty of the golden rays of the sun falling on the Taj Mahal at sunrise is indescribable. The Red Fort in Agra is a very important fort in India’s medieval history. Red Fort is recognized as the site.Fatehpur Sikri is a UNESCO World Heritage Site at a distance of 36 km from Agra city. Many buildings built in the Mughal style of architecture are a special attraction for tourists. All the necessary facilities are provided for the tourists.

Leave a comment

Start a Blog at WordPress.com.

Up ↑