म्हैसूर, ज्याला “कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी” म्हणून ओळखले जाते, हे भारतातील सर्वात मोहक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इतिहास, वारसा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम या शहरात पाहायला मिळतो. चामुंडी टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले हे शहर राजेशाही वारसा, भव्य महाल, समृद्ध परंपरा आणि हिरवाईने नटलेले निसर्गरम्य सौंदर्य यासाठी जगप्रसिद्ध आहे.
इतिहासाच्या दृष्टीने म्हैसूरला दक्षिण भारतात एक विशेष स्थान आहे. एकेकाळी वाडियार घराण्याची राजधानी असलेले हे शहर आज ‘म्हैसूर पॅलेस’साठी जगभर ओळखले जाते. हा भव्य महाल स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना असून दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करतो. टीपू सुलतानची परंपरा आणि वैभवशाली दसरा उत्सव हेही म्हैसूरच्या इतिहासाचे वैशिष्ट्य आहे. महाल, मंदिरे आणि पारंपरिक बाजारपेठांमुळे या शहराला एक अनोखा जुना मोहकपणा लाभला आहे, जो कर्नाटकाच्या सांस्कृतिक वैभवाची झलक दाखवतो.
नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीनेही म्हैसूर कमी नाही. चामुंडी टेकड्या मनोहारी दृश्य देतात, तर शहराभोवती बागा, तलाव आणि अभयारण्ये आहेत. वृंदावन गार्डन्समधील संगीतमय कारंजे, करंजी व कुक्करहळ्ळी तलाव शांत क्षणांसाठी उत्तम आहेत. तर निसर्गप्रेमींसाठी रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य आणि बांदीपूर राष्ट्रीय उद्यान अविस्मरणीय अनुभव देतात.
याशिवाय म्हैसूर योगकेंद्रे, चंदन उत्पादने आणि रेशीम साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. राजेशाही वारसा, रंगतदार उत्सव, स्थापत्यशास्त्रीय वैभव आणि निसर्गरम्य सौंदर्य यांचा सुरेख मिलाफ हे शहर प्रवाशांसाठी अद्वितीय ठरवतो. इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी किंवा सांस्कृतिक रसिक – प्रत्येकासाठी म्हैसूर हे मन मोहून टाकणारे गंतव्यस्थान आहे.
म्हैसूर मधील ऐतिहासिक पर्यटन स्थळे
म्हैसूरचा इतिहास मौर्य काळापर्यंत मागे जातो. म्हैसूरच्या विकासात वडियार राजघराण्यातील राजांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी म्हैसूर मध्ये अनेक ऐतिहासिक वास्तु उभ्या केल्या.त्यामध्ये अंबा विलास पॅलेस किंवा म्हैसूर पॅलेस यासारखे अनेक राजप्रसाद त्यांनी बांधले.याशिवाय मंदिरे,प्रशासकीय इमारती ,सरोवरे आणि बागांची निर्मिती त्यांनी केली.हा समृद्ध वारसा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात म्हैसूरला भेट देतात.

म्हैसूर पॅलेस-म्हैसूर येथे अंबाविलास पॅलेस किंवा यालाच म्हैसूर पॅलेस असे म्हणतात. म्हैसूर पॅलेस हा भव्य दिव्य राजप्रासाद शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दिमाखात उभा आहे. इंडो सरसेनिक,राजपूत आणि द्राविड स्थापत्य शैलीचा एकत्र उपयोग करून हा राजप्रसाद बांधलेला आहे .दररोज संध्याकाळी म्हैसूर पॅलेस मध्ये दिव्यांची रोषणाई चालू केली जाते.रात्रीच्या प्रकाशातील नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून म्हैसूर पॅलेसला भेट देतात. संपूर्ण राजप्रासाद अंतर्बाह्य बारीक नक्षीकाम आणि कलाकुसर यांनी सजवलेला आहे. राजप्रसादातील स्तंभ आणि छत ,त्यावरील चित्रकाम, रंगसंगती तसेच काही ठिकाणी आरशांचा केलेला कलात्मक उपयोग यामुळे राजप्रसादाच्या सौंदर्यामध्ये भर पडली आहे. आतील दरबार हॉल , कल्याण मंडप प्रेक्षणीय आहेत. राज घराण्यातील सदस्यांचे अलंकार, पोशाख व दैनंदिन वापरातील वस्तू संग्रह येथे ठेवलेला आहे. राजप्रसादांमधील एका कक्षात वडियार राजांचा हिरेजडीत सुवर्ण राजमुकुट ठेवलेला आहे. प्रत्येक रविवारी आणि दसरा महोत्सवात संपूर्ण मैसूर पॅलेसवर रोषणाई केली जाते.म्हैसूर पॅलेसचे अद्भुत सौंदर्य पर्यटकांचे आकर्षण केंद्र असते.

जगमोहन पॅलेस– यामध्ये जय चामराजेंद्र आर्ट गॅलरी प्रसिद्ध असून या गॅलरीमध्ये देश-विदेशातील प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रकृती ठेवलेले आहेत . जयलक्ष्मी विलास पॅलेस-महाराजा चामराज वडियार यांची मोठी मुलगी जयलक्ष्मी हिच्यासाठी हा राजप्रसाद बांधलेला आहे. या राजप्रसादामध्ये तीन वस्तू संग्रहालये आहेत. यामध्ये हस्तकला वस्तू ,पुरातत्वीय अवशेष आणि राज घराण्यातील काही मौल्यवान वस्तू ठेवलेल्या आहेत. चेलुवांबा मेंशन, चित्तरंजन पॅलेस,राजेंद्र विलास पॅलेस आणि ललिता पॅलेस इत्यादी प्रसिद्ध राजप्रसाद मैसूर मध्ये आहेत.यापैकी राजेंद्र विलास पॅलेस आणि ललिता पॅलेस या दोन राजप्रसादाचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले आहे.
म्हैसूर येथील सांस्कृतिक स्थळे

चामुंडी हिल -म्हैसूर येथील वडियार राजघराण्यातील मुख्य देवता चामुंडेश्वरी आहे.चामुंडेश्वरीचे मंदिर चामुंडी हिल या ठिकाणी बांधलेले आहे. हे मंदिर द्राविड स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य असून येथून मैसूर शहराचे विहंगम दृश्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. चामुंडेश्वरी मंदिराकडे जाताना वाटेमध्ये महाकाय नंदीची मूर्ती कोरलेली आहे. ही नंदीची मूर्ती भारतातील सर्वात मोठ्या आकाराची मूर्ती आहे.चामुंडी हिल मैसूर मधील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे.

म्हैसूर परिसरातील पर्यटन स्थळे
वृंदावन गार्डन– म्हैसूर जवळ असलेल्या कृष्णराज सागर धरण परिसरात वृंदावन गार्डन विकसित करण्यात आले आहे.कृष्णराज सागर धरण भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेले आहे. वृंदावन गार्डन चा विस्तार तीन टप्प्यांमध्ये केलेला आहे. येथील रंगीबेरंगी फुलांच्या बागा आणि संगीतावर ताल धरून उडणारे कारंजे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. वृंदावन गार्डन मध्ये भारतातील हिंदी तसेच दक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण नेहमी होत असते.म्हैसूर येथे येणारे पर्यटक आवर्जून वृंदावन गार्डनला भेट देतात.

मेलडी वर्ल्ड वॅक्स म्युझियम– या संग्रहालयात कर्नाटकातील विविध वाद्यांचा संग्रह ठेवलेला असून ही सर्व वाद्ये वाजवणाऱ्या कलाकारांचे मेणाचे पुतळे केलेले आहेत. मैसूर पासून जवळच टिपू सुलतान आणि हैदर आली यांच्या मृत्यूनंतर बांधण्यात आलेले स्मारक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात आले आहे. चन्नकेशव मंदिर- मैसूर पासून 35 किमी अंतरावर सोमनाथपूर येथेआहे. होयसळ स्थापत्य शैलीतील अप्रतिम मंदिर पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहे. लिंगबुडी आणि कारंजी सरोवर –याशिवाय मैसूर परिसरात वडियार राजांनी अनेक सरोवरे बांधली.यातील लिंगबुडी सरोवर आणि कारंजी सरोवर प्रसिद्ध आहेत. मैसूर येथील प्राणी संग्रहालय आणि रेल्वे संग्रहालय या ठिकाणी देखील पर्यटक आवर्जून भेट देतात.
म्हैसूर येथे पर्यटकांसाठी सोयी सुविधा
म्हैसूर येथे पर्यटकांसाठी उत्तम, मध्यम आणि सर्वसाधारण दरामध्ये हॉटेल्स उपलब्ध आहेत. दक्षिण भारतातील लोकप्रिय खाद्यपदार्थ आणि म्हैसूर मधील स्थानिक खाद्यपदार्थांचा पर्यटक आस्वाद घेतात. मैसूर येथील बाजारपेठा पर्यटकांचे खास आकर्षण आहे. पारंपरिक सिल्क/ रेशमी साड्या ,चंदना पासून बनवलेल्या विविध वस्तू आणि हस्तकला वस्तू पर्यटक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. पर्यटन विभाग ,कर्नाटक शासन यांच्याकडून पर्यटकांना विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
सारांश
म्हैसूर, ज्याला “कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी” म्हणून ओळखले जाते, हे भारतातील सर्वात मोहक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. राजेशाही वैभव, अप्रतिम वास्तुकला आणि रंगीबेरंगी परंपरांसाठी प्रसिद्ध असलेले हे शहर पर्यटकांना भूतकाळात डोकावण्याची संधी देते. म्हैसूरच्या वारशाचे केंद्र म्हणजे भव्य म्हैसूर पॅलेस, जो इंडो-सरसेनिक शैलीतील वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. दसऱ्याच्या काळात प्रकाशमय झालेला हा राजवाडा, शोभायात्रा, संगीत व नृत्यांनी सजलेला उत्सव म्हैसूरला सांस्कृतिक केंद्र म्हणून जागतिक कीर्ती मिळवून देतो.
राजवाड्याव्यतिरिक्त, म्हैसूरमध्ये जगन्मोहन पॅलेस, सेंट फिलोमेना चर्च आणि चामुंडी टेकडीवरील मंदिर यांसारखी ऐतिहासिक स्थळे आहेत, जी इतिहास, कला आणि अध्यात्म यांचे अद्वितीय दर्शन घडवतात. चित्रकला, संगीत आणि शास्त्रीय नृत्याच्या समृद्ध परंपरांचा सांभाळ करणारे हे शहर दक्षिण भारतीय सांस्कृतिक वारशाचे केंद्र मानले जाते. देवराज मार्केटसारखे गजबजलेले बाजार स्थानिक हस्तकला, चंदनाच्या वस्तू आणि रेशमी साड्या पर्यटकांना खास अनुभव देतात.
म्हैसूर हे केवळ स्मारकांपुरते मर्यादित नाही, तर जिवंत संस्कृतीचेही दर्शन घडवते. रस्त्यांवरील उत्सव, लोकजीवन आणि खाद्यसंस्कृती या प्रवासाला आणखी संस्मरणीय करतात. म्हैसूर पाकचा गोडवा, पारंपरिक फिल्टर कॉफी आणि अस्सल कर्नाटकी पदार्थांची चव पर्यटकांना खास अनुभव देते. तसेच वृंदावन गार्डन्स, श्रीरंगपट्टण आणि संग्रहालये यांसारखी आसपासची स्थळे सांस्कृतिक प्रवासाला समृद्ध करतात.
थोडक्यात, म्हैसूर हे इतिहास, कला आणि परंपरेचे सुंदर मिश्रण असलेले ठिकाण असून भारताचा समृद्ध वारसा जाणून घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक अविस्मरणीय गंतव्य ठरते.
हेही वाचा Ooty Hill Station
Mysuru: A Historical and Cultural Heritage Destination in Karnataka
Mysuru is a famous tourist destination in the Indian state of Karnataka. Mysore has a rich historical and cultural heritage. Mysuru is locally known as Mysuru. The ancient name of Mysuru was Mahishmati. Later it became Mahishpur. Mysuru city is the largest city in Karnataka after Bangalore. Mysuru is a famous trading center for silk and cotton production. Mysuru Palace, Chamundi Hill and Vrindavan Gardens are special tourist attractions in Mysuru.
Historical Tourist Destinations at Mysuru
Mysuru , known as the “Cultural Capital of Karnataka”, is one of the most enchanting tourist destinations in India. A beautiful blend of history, heritage and nature can be seen in this city. Nestled at the foothills of the Chamundi Hills, the city is world-famous for its royal heritage, grand palaces, rich traditions and lush green scenery.
Historically, Mysuru holds a special place in South India. Once the capital of the Wadiyar dynasty, the city is now known worldwide for the ‘Mysuru Palace’. This magnificent palace is a unique example of architecture and attracts millions of tourists every year. The tradition of Tipu Sultan and the glorious Dussehra festival are also features of Mysuru’s history. The palaces, temples and traditional markets have given the city a unique old charm, which gives a glimpse of the cultural splendor of Karnataka.
Mysuru is no less in terms of natural beauty. The Chamundi Hills offer a picturesque view, while the city is dotted with gardens, lakes and sanctuaries. The musical fountains at Vrindavan Gardens, Karanji and Kukkarhalli lakes are great for peaceful moments. For nature lovers, the Ranganathittu Bird Sanctuary and Bandipur National Park offer unforgettable experiences.
Apart from this, Mysuru is famous for its yoga centres, sandalwood products and silk sarees. The city is a unique blend of royal heritage, colourful festivals, architectural splendour and scenic beauty. Be it a history buff, a nature lover or a culture buff – Mysuru is a captivating destination for everyone.
Mysuru Palace–Ambavilas Palace in Mysuru or also known as Mysuru Palace. Mysuru Palace is a grand divine palace standing in the heart of Mysuru city. This Rajprasad is built using a combination of Indo Saracenic, Rajput and Dravidian architectural styles. Every evening the lights are switched on in the Mysuru Palace. Tourists visit the Mysuru Palace to see the picturesque scene in the night light. The entire Rajprasad is decorated with fine carvings and crafts inside and out. The pillars and ceilings of the Rajprasad, the paintings on them, the color scheme and the artistic use of mirrors at some places have added to the beauty of the Rajprasad. The inner Durbar Hall, Kalyan Mandap are spectacular. A collection of ornaments, costumes and daily use items of the members of the royal family is kept here. In one of the chambers of the Rajaprasad, the golden crown of the Wadiyar kings is kept in Hirejadi. The entire Mysuru Palace is illuminated every Sunday and during the Dussehra festival. The magnificent beauty of the Mysuru Palace is a tourist attraction.
Jaghmoman Palace– In this palace Jaya chamarajendra Art Gallery is famous and the gallery has painted paintings of famous painters from across the country and abroad. Jayalakshmi Vilas Palace– this Raj Prasad is built for Jayalakshmi, the eldest daughter of Maharaja Chamraj Vadiaar. There are three goods museums in this palace. These include handicrafts, archaeological remnants and some valuables in the home. The famous Rajprasad Mysuru are Cheluwamba Mention, Chittaranjan Palace,Rajendra Vilas Palace.Among these Palaces Rajendra Vilas Palace and Lalita Palaces are converted in the hotel.
Cultural Destinations in Mysuru
Chamundi Hill Mysore- The main deity of the Wadiyar dynasty in Mysuru is Chamundeshwari. The temple of Chamundeshwari is built at Chamundi Hill. This temple is built in Dravidian architectural style. The whole area is scenic and the panoramic view of Mysuru city from here attracts the attention of tourists. On the way to the Chamundeshwari temple, there is a giant Nandi idol carved on the way. This Nandi idol is the largest idol in India. Chamundi Hill is a famous religious tourist spot in Mysuru.
Tourist places in Mysuru area
Brindavan Garden-Brindavan Garden has been developed in Krishnaraj Sagar Dam area near Mysuru. Krishnaraj Sagar Dam Bharat Ratna M. Built under the guidance of Visvesvaraya. Brindavan Garden has been expanded in three phases. The colorful flower gardens and the fountains that fly to the rhythm of the music are special attractions for tourists. Vrindavan Garden is often used for filming of Hindi and South Indian movies. Tourists coming to Mysore must visit Vrindavan Garden.
Melody World Wax Museum– This museum houses a collection of various musical instruments from Karnataka and wax figures of artists who play all these instruments. The memorial built after the deaths of Tipu Sultan and Hyder Ali near Mysuru has been developed for tourism. Channakesava Temple– Located at Somnathpur, 35 km from Mysuru. The Hoysala architectural style temple is a special attraction for tourists. Apart from this, many lakes were built by the Wadiyar kings in Mysuru area.Lingabadi lake and Karanji lake are famous among them. Zoological Museum and Railway Museum in Mysuru are also must-visit places for tourists.
Tourist Facilities at Mysuru
Tourist Facilities at Mysuru offers hotels in good, medium and general price range for tourists. Tourists enjoy the popular food of South India and the local cuisine of Mysuru. Markets in Mysuru are a special attraction for tourists. Tourists buy traditional silk sarees, various articles made of sandalwood and handicrafts in large quantities. Tourism Department, Government of Karnataka has provided special facilities to the tourists.
Summary
Mysuru, known as the “Cultural Capital of Karnataka”, is one of the most enchanting historical and cultural heritage destinations in India. Known for its royal splendor, stunning architecture and colourful traditions, the city offers tourists a glimpse into the past. The centrepiece of Mysuru’s heritage is the magnificent Mysore Palace, a fine example of Indo-Saracenic architecture. The palace, illuminated during Dussehra, is adorned with processions, music and dance, earning Mysuru a global reputation as a cultural hub.
Apart from the palace, Mysuru is home to historical sites like Jaganmohan Palace, St. Philomena’s Church and the Chamundi Hill Temple, which offer a unique glimpse into history, art and spirituality. The city, which preserves the rich traditions of painting, music and classical dance, is considered the centre of South Indian cultural heritage. Bustling markets like Devraj Market offer a unique experience to tourists, offering local handicrafts, sandalwood items and silk sarees.
Mysuru is not just about monuments, it also showcases a vibrant culture. Street festivals, folk life and food culture make the trip even more memorable. The sweetness of Mysore cuisine, traditional filter coffee and the taste of authentic Carnatic dishes offer a special experience to the tourists. Also, nearby places like Vrindavan Gardens, Srirangapatna and museums enrich the cultural journey.
In short, Mysuru is a place with a beautiful blend of history, art and tradition, making it an unforgettable destination for tourists who want to know the rich heritage of India.
