कोणार्क सूर्य मंदिर: सांस्कृतिक वारसा स्थळ|Konark Sun Temple: Cultural Heritage Destination

कोणार्क येथील सूर्य मंदिर हे भारताच्या स्थापत्य वैभवाचे आणि सांस्कृतिक वारशाचे भव्य उदाहरण आहे. ओडिशामध्ये वसलेले हे मंदिर इ.स. १३व्या शतकात पूर्व गंग राजवंशातील राजा नरसिंहदेव प्रथम यांनी बांधले. सूर्यदेवाला अर्पण केलेले हे मंदिर रथाच्या अद्वितीय आकारात उभारले गेले असून त्याला बारा सुंदर कोरीव दगडी चाकं आणि सात घोडे आहेत, जे सूर्याच्या आकाशातील प्रवासाचे प्रतीक मानले जाते.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेले कोणार्कचे सूर्य मंदिर हे कलात्मकता, आध्यात्मिक प्रतीकात्मकता आणि वैज्ञानिक अचूकतेचे अद्भुत मिश्रण दर्शवते. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पकलेत केवळ देवदेवताच नव्हे, तर त्या काळातील समाजजीवन, संगीत, नृत्य आणि संस्कृतीचेही दर्शन घडते. त्यामुळे हे मंदिर त्या युगाचा सजीव इतिहास जतन करणारे ठरते. काळाच्या ओघात मंदिराचे काही भाग नष्ट झाले असले तरीही आजही त्याचे अवशेष त्याच्या निर्मात्यांच्या दूरदृष्टीची आणि अद्वितीय कौशल्याची साक्ष देतात.

Konark Sun Temple Location

Konark Sun Temple
Konark Sun Temple

कोणार्क सूर्य मंदिर दंतकथा

सूर्य मंदिर बांधण्यासाठी बाराशे कामगार अहोरात्र काम करीत होते परंतु मंदिर राजाने दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण होऊ शकले नाही मंदिर मुदतीमध्ये बांधून पूर्ण झाले नाही तर बाराशे कामगारांना ठार मारण्यात येईल असे राजाने मुख्य स्थपतीला सांगितले होते .त्यावेळी मुख्य स्थपतीचा बारा  वर्षाचा मुलगा धर्मव्रत मंदिराच्या शिखरावर जाऊन उडी मारून आपल्या प्राणांचे बलिदान देतो आणि बाराशे कामगारांचे जीव वाचवतो. तेव्हापासून सूर्य मंदिरामध्ये पूजा केली जात नाही अशी दंतकथा येथे प्रचलित आहे.

कोणार्क सूर्य मंदिर स्थापत्य कला आणि शिल्पकला

अद्वितीय स्थापत्य कला-कोणार्कचे सूर्य मंदिर म्हणजे एक प्रचंड आकाराचा सूर्य रथ आहे. मंदिराची मूळ रचना गर्भगृह,अंतराळ, सभा मंडप,जगमोहन,मुख मंडप आणि  नाट्य मंडप याप्रमाणे होती. सूर्य मंदिर उंच जोत्यावर बांधलेले आहे.जोत्याच्या दोन्ही बाजूला बारा चक्र आहेत. प्रत्येक चक्राला आठ आरे आहेत.ही बारा चक्र म्हणजे बारा महिन्याचे प्रतीक आहेत. तसेच चक्रांवरील आठ आरे म्हणजे आठ प्रहर असल्याचे मानले जाते. मंदिरासमोर सात प्रचंड आकाराचे घोडे आहेत ते सात दिवसांचे प्रतिनिधित्व करतात. 1903 मध्ये सभा मंडपाची पडझड होऊ नये म्हणून सभामंडपामध्ये वाळूची भर घालून तीनही दरवाजे बंद करण्यात आले. गर्भगृहाचा फक्त पाया शिल्लक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 2022 पासून सभा मंडपातील वाळू बाहेर काढण्याचे काम चालू केले आहे.

प्रेक्षणीय नाट मंडप – कोणार्क सूर्य मंदिर समोर नाट्य मंडपातील अनेक  स्तंभावर विविध मुद्रा अभिनयातील सुरसुंदरी तसेच नृत्य,गायन आणि वादन करीत असलेले नर्तक, नर्तकी वादक आणि गायक, गायिका यांच्या जवळपास 277 मूर्ती या खांबांवर कोरलेल्या आहेत. पूर्वी या नाट्य मंडपामध्ये देवदासी आपली कला सादर करीत असत. या मंडपातील एक स्तंभ अरुण स्तंभ या नावाने ओळखला जातो.

अप्रतिम शिल्पकला – कोणार्क सूर्य मंदिराच्या जोत्यावर तसेच बारा चक्रे यांच्यावर असंख्य मिथुन शिल्प आणि दैनंदिन जीवनातील प्रसंगांवर आधारित शिल्पपट कोरलेले आहेत. खजुराहो नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात मिथुन शिल्प फक्त कोणार्क येथील सूर्य मंदिरावर पहावयास मिळतात. यावरून त्या काळात येथे तांत्रिक पंथांचे अस्तित्व होते हे स्पष्ट होते. याशिवाय या मंदिरावर  घोडे, हत्ती ,वाघ ,सिंह, पशुपक्षी,जलचर  तसेच व्याल(legendary animal) यांच्याही प्रतिमा मोठ्या प्रमाणात कोरलेले आहेत.

कोणार्क येथील वैशिष्ट्यपूर्ण सूर्य प्रतिमा

कोणार्क सूर्य मंदिरामध्ये सध्या तीन सूर्य प्रतिमा आहेत. मुख्य मंदिराच्या दक्षिण,उत्तर आणि पश्चिमेकडील भिंतीमध्ये या मूर्ती ठेवलेल्या आहेत. या तीन सूर्य प्रतिमा सूर्योदय ,मध्यान्ह आणि सूर्यास्त या अवस्था दर्शविणारे आहेत. पंधराव्या शतकामध्ये मंदिरावर झालेल्या आक्रमणात मुख्य गर्भगृहातील सूर्य प्रतिमा पुरी येथे हलविण्यात आली होती. सध्या ही प्रतिमा कुठे आहे याबद्दलची नोंद ठेवण्यात आलेली नाही.

Sun Images on Konark Temple
Sun Images on Konark Temple

कोणार्क परिसरातील सांस्कृतिक पर्यटन स्थळे

कोणार्क सूर्य मंदिर परिसरात मुख्य मंदिरा शिवाय मायादेवी मंदिर, बलराम, वराह, वामन- त्रिविक्रम या देव देवतांची मंदिरे आहेत. तसेच विष्णू, शिव, गजलक्ष्मी, पार्वती, श्रीकृष्ण आणि नरसिंह इत्यादी पौराणिक देवदेवतांच्या मूर्ती आहेत.तर इंद्र, अग्नी, कुबेर, वरूण, आदित्य इत्यादी वैदिक देवदेवतांच्या मूर्ती कोणार्क येथील सूर्य मंदिर परिसरात आहेत. याशिवाय भोग मंडप (स्वयंपाक गृह) ही वास्तू या ठिकाणी आहे. कोणार्क जवळ जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथ मंदिर आणि भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर प्रसिद्ध व लोकप्रिय संस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.

कोणार्क परिसरात पर्यटकांसाठी सोयी सुविधा

कोणार्क सूर्य मंदिर जागतिक वारसा स्थळ असल्यामुळे देश-विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. पुरातत्व विभाग आणि ओडिसा सरकार द्वारे या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. रात्री लाईट अँड साऊंड शो दाखवला जातो. पुरी येथे सर्वात जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन असल्यामुळे कोणार्क येथे पोहोचणे सोयीचे झाले आहे.

सारांश

कोणार्कचे सूर्य मंदिर हे ओडिशामध्ये स्थित भारताच्या सांस्कृतिक आणि स्थापत्य वारशाचे एक अप्रतिम शिल्प आहे. इ.स. १३व्या शतकात पूर्व गंग राजवंशातील राजा नरसिंहदेव प्रथम यांनी या मंदिराची उभारणी केली. सूर्यदेवाला अर्पण केलेले हे मंदिर एका भव्य रथाच्या स्वरूपात बांधले गेले असून, सात घोडे आणि बारा कलाकुसर केलेली दगडी चाकं सूर्याच्या आकाशातील प्रवासाचे प्रतीक मानली जातात. ही रचना केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून शास्त्रीय अचूकता आणि सर्जनशीलतेचेही दर्शन घडवते.

इतिहासाच्या दृष्टीने पाहता, हे मंदिर कलिंग स्थापत्यशैलीच्या शिखराचे प्रतीक आहे आणि पूर्व गंग राजवंशाच्या वैभवाची साक्ष देते. मंदिरातील रचना व शिल्पांमध्ये खगोलशास्त्र, भूमिती आणि अभियांत्रिकीविषयीचे प्रगत ज्ञान स्पष्ट दिसून येते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेले हे मंदिर आजही त्याच्या भव्यतेसाठी आणि प्रतीकात्मकतेसाठी प्रसिद्ध आहे.

कलात्मक दृष्टिकोनातून, या मंदिराच्या शिल्पांमध्ये अद्वितीय सौंदर्य सामावलेले आहे. मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या पुराणकथांतील प्रसंग, देव-देवता, अप्सरा, प्राणी तसेच त्या काळातील सामाजिक जीवनाचे दृश्य या सर्वांची जिवंत चित्रमय मांडणी दिसून येते. रेखीव शिल्पकला आणि अलौकिक मूर्ती कारागिरांच्या असामान्य कौशल्याची प्रचिती घडवतात.

आज सूर्य मंदिर भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. याचे ऐतिहासिक आणि कलात्मक महत्त्व पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येथे येतात. दरवर्षी आयोजित केला जाणारा कोणार्क नृत्य महोत्सव या मंदिराच्या पार्श्वभूमीवर भारताच्या शास्त्रीय नृत्य परंपरेचे दर्शन घडवतो. जवळच असलेला चंद्रभागा समुद्रकिनारा आणि सुंदर किनारी परिसर या यात्रेला अधिक आकर्षक बनवतो.

कोणार्कची सफर ही फक्त पर्यटन नाही, तर भारताच्या वैभवशाली इतिहास, कला, अध्यात्म आणि निसर्गाचा एकत्रित अनुभव घेण्याची अविस्मरणीय संधी आहे.

Konark Sun Temple: Cultural Heritage   Destination

The Sun Temple at Konark is a magnificent example of India’s architectural splendor and cultural heritage. Located in Odisha, this temple was built in the 13th century AD by King Narasimha Deva I of the Eastern Ganga Dynasty. Dedicated to the sun god, this temple is built in the unique shape of a chariot and has twelve beautifully carved stone wheels and seven horses, which are considered to symbolize the sun’s journey across the sky.

Included in the UNESCO World Heritage Sites, the Sun Temple of Konark shows a wonderful blend of artistry, spiritual symbolism and scientific precision. The sculptures on the temple walls not only depict gods and goddesses, but also the social life, music, dance and culture of that time. Therefore, the temple preserves the living history of that era. Although parts of the temple have been destroyed over time, its remains even today testify to the vision and unique skill of its builders.

Legend of Konark Sun Temple

Twelve hundred workers were working round the clock to build the Sun Temple, but the temple could not be completed within the time limit given by the king. The king had told the chief builder that if the temple was not built within the deadline, the twelve hundred workers would be killed. He sacrifices his life and saves the lives of twelve hundred workers. Since then there is a legend that worship is not performed in the Sun Temple.

Konark Sun Temple Architecture and Sculpture

Unique architecture– Konark’s Surya Mandir is a gigantic Sun Chariot. The original structure of the temple consisted of sanctum sanctorum, antaral, assembly mandap, jagmohan, mukh mandap and natya mandap. The Surya temple is built on a tall joty. There are twelve chakras on either side of the joty. Each chakra has eight arcs. These twelve chakras are symbols of twelve months. Also the eight saws on the chakras are believed to be the eight prahars. In front of the temple there are seven gigantic horses representing the seven days. In 1903, sand was added to the hall to prevent it from collapsing, and all three doors were closed. Only the foundation of the sanctum remains. The Archaeological Survey of India has started sand extraction work from 2022.

Spectacular Naat Mandap – In front of Konark Surya Mandir, there are around 277 idols of Naat Mandap in front of Konark Surya Mandir, with beauties in various postures, as well as dancers, musicians, singers and singers. Earlier, Devadasis used to perform their art in this Natya Mandapam. One of the pillars in this mandap is known as Arun pillar.

Amazing Sculptures – Numerous mithuna sculptures and sculptures based on daily life scenes are carved on the yoke of the Konark Sun Temple as well as the twelve chakras. After Khajuraho, Mithun sculptures in such a large scale are seen only at the Sun Temple at Konark. From this it is clear that Tantric sects existed here during that period. Apart from this, the images of horses, elephants, tigers, lions, animals and birds, aquatic animals as well as legendary animals are also carved on this temple.

The Typical Sun Images at Konark

Konark Surya Temple currently has three Surya images. These idols are placed in the south, north and west walls of the main temple. These three sun images represent sunrise, midday and sunset. The sun image in the main sanctum was moved to Puri during the invasion of the temple in the 15th century. There is currently no record of the image’s whereabouts.

Cultural Tourism Places in Konark Area

Apart from the main temple in the Konark Sun Temple area, there are temples of Mayadevi Temple, Balaram, Varaha, Vamana-Trivikram. There are also idols of mythological gods like Vishnu, Shiva, Gajalakshmi, Parvati, Shri Krishna and Narasimha etc. while the idols of Vedic gods like Indra, Agni, Kubera, Varuna, Aditya etc. are in the Sun Temple area of Konark. Apart from this, Bhog Mandap (cooking house) is also located here. Jagannath Temple at Jagannath Puri near Konark and Lingaraj Temple at Bhubaneswar are famous and popular cultural tourist destinations.

Convenience facilities for tourists in Konark area

As Konark Sun Temple is a world heritage site, tourists from home and abroad visit this place in large numbers. All kinds of facilities have been provided at this place by the Department of Archeology and Government of Odisha. A light and sound show is shown at night. Reaching Konark is convenient as Puri is the nearest airport and railway station.

Summary

The Sun Temple of Konark is a magnificent piece of Indian cultural and architectural heritage located in Odisha. It was built in the 13th century AD by King Narasimha Deva I of the Eastern Ganga Dynasty. Dedicated to the Sun God, this temple is built in the form of a magnificent chariot, with seven horses and twelve intricately carved stone wheels symbolizing the Sun’s journey across the sky. This structure is not only a symbol of religious faith but also a display of scientific precision and creativity.

Historically, this temple symbolizes the pinnacle of Kalinga architecture and testifies to the glory of the Eastern Ganga Dynasty. The structure and sculptures of the temple clearly demonstrate advanced knowledge of astronomy, geometry and engineering. Included in the UNESCO World Heritage Sites, this temple is still famous for its grandeur and symbolism.

From an artistic point of view, the sculptures of this temple have unique beauty. The walls of the temple are carved with vivid depictions of mythological scenes, gods and goddesses, nymphs, animals and scenes of social life of that time. The intricate carvings and the extraordinary statues reveal the extraordinary skill of the craftsmen.

Today, the Sun Temple is one of the most popular tourist destinations in India. Tourists from all over the country and abroad come here to witness its historical and artistic significance. The Konark Dance Festival, held every year, showcases the classical dance tradition of India against the backdrop of this temple. The nearby Chandrabhaga beach and the beautiful coastal area make this pilgrimage even more attractive.

A trip to Konark is not just a tourist attraction, but an unforgettable opportunity to experience India’s glorious history, art, spirituality and nature together.

Leave a comment

Start a Blog at WordPress.com.

Up ↑