त्रिरश्मी बौदध लेणी । Trirashmi Buddhist Caves

त्रिरश्मी पांडवलेणी महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर त्रिरश्मी डोंगरामध्ये आहेत. प्राचीन भारतातील सातवाहन, कलचुरी आणि वाकाटक या घराण्यातील राजांनी ही लेणी खोदलेली आहेत. प्राचीन कल्याण ते नाशिक या व्यापारी मार्गावर ही लेणी आहेत. जवळपास 250 पायऱ्या चढून गेल्यानंतर पांडवलेणी दृष्टीपथात येतात.पांडवलेणी येथे एकूण 24 बौद्ध लेणी आहेत.येथील लेण्यांमध्ये गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणात कोरलेल्या आहेत.पांडवलेणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागा द्वारे एक संरक्षित वास्तू आहे. नाशिक येथील सांस्कृतिक पर्यटनाच्या दृष्टीने पांडवलेणी महत्त्वाचे ठिकाण आहे.

Trirashmi Caves Nashik
Trirashmi Caves Nashik

बुद्धमय त्रिरश्मी पांडव लेणी

नाशिक येथील त्रिरश्मी पांडव लेणी महायान पंथाची आहेत.बौद्ध धर्मामध्ये हीनयान, महायान आणि वज्रयान असे तीन प्रमुख धर्मपंथ आहेत. धर्मप्रसार करण्यासाठी बौद्ध भिक्षु भारताच्या विविध भागांमध्ये भ्रमंती करीत असत. त्यांना राहण्यासाठी विविध व्यापारी मार्गावर मोठ्या प्रमाणात लेणी खोदण्यात आल्या. महाराष्ट्रामध्ये लेणी खोदण्यासाठी अनुकूल खडक उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त लेणी किंवा शैलगृहे खोदण्यात आली. सुरुवातीच्या काळात पांडवलेणी येथे हीनयान पंथाचा प्रभाव होता. पुढील काळात महायान पंथाचा प्रभाव वाढल्यामुळे पांडवलेणी येथे बहुसंख्य लेण्यांमध्ये गौतम बुद्धाच्या विविध प्रतिमा आढळतात.याशिवाय  येथे बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी विहार केलेले होते.देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात पांडवलेणी नाशिक येथे भेट देतात.

Trirashmi Pandav leni Nashik Location Map

प्रेक्षणीय बौद्ध स्थापत्य 

बौद्ध विहार -त्रिरश्मी पांडवलेणी येथे एकूण २४ बौद्ध  लेणी आहेत. बौद्ध स्थापत्य कलेमध्ये विहार, चैत्य आणि स्तूप या वास्तूंचा समावेश होतो. यापैकी लेणी क्रमांक तीन, दहा आणि सतरा ही लेणी म्हणजे चैत्यगृह आहेत. विहार म्हणजे ज्या ठिकाणी बौद्ध भिक्षूंना राहण्याची व्यवस्था केलेली असते तर चैत्यगृह म्हणजे ज्यामध्ये प्रार्थना करण्यासाठी स्तूप किंवा बौद्ध प्रतिमा कोरलेली असते.बौद्ध भिक्षूंना पाण्याची सोय होण्यासाठी पाण्याच्या टाक्या विहारांसमोर खोदलेल्या आहेत.नाशिक येथील पांडवलेणी बुद्धमय झालेली.

चैत्यगृह – त्रिरश्मी पांडवलेणी येथील महायान चैत्यगृहांची रचना मंदिरासारखी आहे. चैत्यगृहाची रचना मंडप, अंतराळ आणि गर्भगृह याप्रमाणे केलेली आहे. गर्भगृहामध्ये गौतम बुद्धाची आसनावर बसलेली मूर्ती आणि बोधिसत्वाची मूर्ती आहे. एक चैत्य गृह हीनयान पंथाचे आहे. या चैत्य गृहामध्ये मागील बाजूस स्तूप कोरलेला आहे. याचे छत चापाकृती आहे. हे लेणे पाहिल्यानंतर भाजे येथील चैत्यगृहाची आठवण होते. येथील लेण्यांमध्ये गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणात कोरलेल्या आहेत. गौतम बुद्धाच्या बहुतेक सर्व प्रतिमा धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत आहेत.

पर्यटन सोयी सुविधा

नाशिक येथील त्रिरश्मी पांडव लेणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागा द्वारे एक संरक्षित वास्तू आहे. ऑक्टोबर ते मार्च महिन्यामध्ये येथे भेट देण्यास अनुकूल वातावरण असते. नाशिक येथून पांडवलेणी कडे जाण्यासाठी बस,रिक्षा आणि टॅक्सी उपलब्ध आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने सध्या पांडवलेणी दुर्लक्षित आहे.पुरातत्व विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या समन्वयाने या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटनाच्या दृष्टीने  पांडवलेण्याचा विकास होणे शक्य आहे.नाशिक मध्ये येणारा पर्यटक क्वचितच पांडवलेणी येथे भेट देतो. पांडवलेणी पर्यटन वाढीसाठी स्थानिक प्रशासन आणि लोकसहभाग महत्त्वाचा आहे.

लेणी परिसरातील सांस्कृतिक पर्यटन

त्रिरश्मी पांडवलेणी पासून जवळच साडेतीन पीठांपैकी एक असलेले सप्तशृंगी वणीSaptashrungi Vani Location; तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर Trimbakeshwar Nashik Location आणि नाशिक मधील पंचवटी Panchavati Nashik Location ही ठिकाणे सांस्कृतिक पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध स्थळे आहेत .याशिवाय पांडवलेण्याच्या पायथ्याशी दादासाहेब फाळके स्मारक पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

                                                                             

सारांश

त्रिरश्मी पांडव लेणी नाशिक मधील एक प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे.पांडवलेणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागा द्वारे एक संरक्षित वास्तू आहे.पांडव लेणी येथील स्थापत्य व शिल्पकला वैशिष्ट्यपूर्ण आहे.पांडव लेणी येथे पर्यटकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा आहेत. पांडवलेणी नाशिक परिसरात इतरही अनेक पर्यटन स्थळे आहेत. नाशिक येथील पांडव लेणी पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.

Trirashmi Buddhist Caves

Trirashmi Pandav leni is located at a distance of eight kilometers from the city of Nashik in Maharashtra. These caves were dug by kings of the Satavahana, Kalachuri and Vakataka dynasties of ancient India. These caves are located on the ancient trade route from Kalyan to Nashik. There are a total of 25 Buddhist caves here. The caves here have huge carvings of Gautama Buddha and Bodhisattva images. Pandavaleni is a protected structure by the Archaeological Survey of India. Nashik here is a cultural historical Pandavaleni place.

Buddhamay Trirashmi Pandav leni 

The Pandav lenis of Nashik belong to the Mahayana sect. There are three major sects of Buddhism namely Hinayana, Mahayana and Vajrayana. Buddhist monks used to travel to different parts of India to spread the religion. A large number of caves were dug along various trade routes to house them. Due to the availability of rock suitable for cave digging in Maharashtra, the largest number of caves or rock houses were excavated in Maharashtra. In the early days Pandavaleni was influenced by the Hinayana sect. Due to the influence of the Mahayana sect in the later period, various images of Gautama Buddha are found in most of the caves in Pandavaleni. Apart from this, there were viharas for Buddhist monks to live in. Tourists from all over the country visit Pandavaleni Nashik in large numbers.

Spectacular Buddhist Architecture

Buddhist Vihara – Pandav leni There are total 24 Buddhist caves in Nashik. Buddhist architecture includes viharas, chaityas and stupas. Out of these caves number three, ten and seventeen are Chaityagrihas. A vihara is a place where Buddhist monks are accommodated while a chaityagriha is a stupa or a Buddhist image carved in it for praying. Water tanks are dug in front of the viharas to provide water for the Buddhist monks. Pandav leni in Nashik became Buddha.

Chaityagriha – Pandav leni Mahayana Chaityagrihas in Nashik are designed like a temple. The Chaityagriha is designed as Mandapa, Antarala and Sanctum sanctorum. The sanctum sanctorum has a seated statue of Gautama Buddha and a Bodhisattva statue. A chaitya house belongs to the Hinayana sect. This chaitya griha has a stupa carved at the back. Its roof is arched. After seeing this cave, one remembers the Chaitya Griha at Bhaje. The caves here are richly carved with images of Gautama Buddha and Bodhisattvas. Most of the images of Gautama Buddha are in Dhammachakra pravartana mudra.

Tourist facilities at Trirashmi

Pandav leni in Nashik is a protected monument by the Archaeological Survey of India. October to March is the best time to visit here. Buses, rickshaws and taxis are available to reach Pandav leni from Nashik. In terms of tourism, Pandav leni is neglected at present. In coordination with the Department of Archeology and Tourism Department, it is possible to develop Pandav leni in terms of tourism if the facilities are provided for the tourists. Tourists who come to Nashik rarely visit Pandav leni. Local governance and public participation are important for the growth of Pandav leni tourism.

Other Tourist Places Near Trirashmi

Saptshringi Vani, one of the three and a half pithas, is close by from Pandavaleni; Also Trimbakeshwar which is one of the twelve Jyotirlingas and Panchavati in Nashik are famous places in terms of cultural tourism. Apart from this, Dadasaheb Phalke Memorial at the base of Pandav leni is a tourist attraction.

Summary

Trirashmi Pandav leni is a spectacular tourist spot in Nashik. Pandavaleni is a protected structure by Archaeological Survey of India. The architecture and sculpture in Pandav leni is unique. Pandav leni has all the necessary facilities for tourists. There are many other tourist spots in Pandav leni Nashik area. Pandav leni in Nashik is waiting for tourists.

2 thoughts on “त्रिरश्मी बौदध लेणी । Trirashmi Buddhist Caves

Add yours

Leave a comment

Start a Blog at WordPress.com.

Up ↑