जैन लेणी समूह एलोरा |Jain Cave Group Ellora

एलोरा येथील जैन लेणी समूह – वेरूळ येथील लेणी समूहात हिंदू, बौद्ध व जैन लेणी खोदलेल्या आहेत. येथील समूहात एकूण 34 लेणी आहेत. त्यातील 12 लेणी बौद्ध धर्मीय आहेत ,17 लेणी हिंदू धर्मीय आहेत तर ५ लेणी जैन धर्मीय आहेत.वेरूळ येथील क्रमांक ३० ,३१, ३२, ३३ आणि ३४ क्रमांकाची लेणी जैन धर्मिय आहेत. 

Jain cave group

वेरूळ येथील जैन लेणी समूह

छोटा कैलास वेरूळ -वेरूळ एलोरा येथील जैन लेणी समूह छोटा कैलास -वेरूळ येथील लेणी क्रमांक 30 छोटा कैलास या नावाने ओळखली जाते. या लेण्यातील  वायव्येला एक अर्धवट खोदलेले लेणे आहे. मुख मंडप त्यामागे दोन बाजूंच्या टोकांना प्रत्येकी एक दालन असलेला व्हरांडा आणि त्यामागे अपूर्ण अवस्थेत असलेला मंडप अशी याची रचना आहे. मुख मंडपावर तसेच ओवरीच्या वरच्या भागावर आणि मंडपावर जैन देवतांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर कोरलेल्या आहेत. मुख दर्शनाच्या वरच्या भागात अनेक मजली शिखर उठावा मध्ये कोरलेले आहे. अपूर्णावस्थेतील मंडपाच्या मध्यभागी एक मोठा स्तंभ असून त्याच्या चारही बाजूंवर जैन तीर्थकारांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

इंद्रसभा -वेरूळ एलोरा जैन लेणी समूहातील इंद्रसभा-वेरूळ जैन लेणी समूहातील क्रमांक 32 चे लेणे इंद्र सभा या नावाने ओळखले जाते. या लेण्यांमध्ये प्रवेश करताना गोपूरातून जावे लागते. गोपुरातून प्रवेश केल्यानंतर प्रांगण लागते. प्रांगणाच्या मध्यभागी मंदिर आहे. या मंदिराच्या एका बाजूस हत्ती आणि दुसऱ्या बाजूस स्तंभ आहे. येथील हत्ती कैलास लेण्यातील हत्तीप्रमाणेच आहे. दुसऱ्या बाजूस असलेल्या स्तंभावर एकमेकांकडे पाठ करून असलेले व वेगवेगळ्या दिशांना तोंड करून असलेले यक्ष आहेत. स्तंभाला लागून ओवरी तसेच चार स्तंभांवर योजलेला मंडप मंडपाच्या मागे गर्भगृह अशी रचना असलेले मंदिर आहे. या मंदिरापलीकडे आणखी एक मंदिर असून त्याच्यासमोर आणखी एक मंदिर आहे. या तिन्ही मंदिरांमध्ये कमी अधिक प्रमाणात जैन देवतांच्या मूर्ती व तीर्थंकरांच्या मूर्ती कोरलेले आहेत. ही तिन्ही मंदिरे प्रांगणाच्या डाव्या बाजूस आहेत. प्रांगणाच्या उजव्या बाजूस मंदिरे नाहीत. येथील प्रांगणातील सर्वात आकर्षक वास्तू म्हणजे मध्यभागी असलेले मंदिर होय. या मंदिराचे शिखर कैलास शिखराप्रमाणेच आहे. 

इंद्रसभा पहिला मजला -इंद्रसभा लेणे दोन मजली आहे. खालच्या मजल्यावरील लेण्यांमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. खालच्या मजल्यावर तीर्थंकारांच्या दोन मूर्ती कोरलेल्या आहेत. यापैकी एक मूर्ती शांतीनाथांची आहे.इंद्रसभेच्या वरच्या मजल्यावरील मंदिर संकुल खूप प्रेक्षणीय आहे. एका बाजूने वर जाण्यासाठी पायऱ्या केलेले आहेत. मुख्य गर्भगृह दक्षिणेकडे तोंड करून आहे. गर्भगृहाच्या दोन बाजूस उपगर्भगृह आहेत. मुख्य मंडपाच्या दोन भिंतीमध्ये देव कोष्टक केल्या असून पार्श्वनाथांची मूर्ती त्यामध्ये आहे. बाहुबली चे महात्म्य दाखवणारा कथा शिल्पपट त्यामध्ये आहे. ओवरीच्या दोन्ही बाजूंवर जैन देवता अंबिका आणि यक्ष दाखवलेला आहे. इंद्र सभेच्या छतावर आतील बाजूस छतावर चित्रकाम केलेले आहे. त्यामध्ये जैन धर्मातील अनेक कथानके चित्रित करण्यात आली आहेत.

जगन्नाथ सभेच्या वरच्या मजल्यावर एक मंदिर असून मंडप आणि गर्भगृह अशी त्याची रचना आहे. गर्भ गृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला यक्ष यक्षी आहेत आणि दोन्ही बाजूच्या भिंतींवर तीर्थंकरांच्या मूर्तीपट्ट आहेत.

सारांश

वेरूळ एलोरा येथील  जैन लेणी समूह पाहण्यासाठी देश विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. वेरूळ येथील जैन लेणी समूहातील छोटा कैलास, इंद्रसभा आणि जगन्नाथ सभा या लेणी अतिशय प्रेक्षणीय आहेत.

The cave group at Verul has excavated Hindu, Buddhist and Jain caves. There are a total of 34 caves in this group. 12 caves are Buddhist, 17 are Hindu and 5 are Jain. Caves No. 30, 31, 32, 33 and 34 in Verul are Jain cave group.

Jain Caves at Ellora

Idols of Tirthankaras Jagannath Sabha-There are idols of Tirthankaras, one each on the walls on either side of the entrance to the mandapam. There are seated idols of Tirthankaras on the three walls of the garbha griha. The structure of the large caves on the ground floor is similar. It has a pillared overi, mandap, space and garbha griha. This temple also has idol sculptures of Ambika, Yakshi, Yaksha, Parswanath and Baahubali. There are about 22 idols of Tirthankaras in this temple.

On the top floor of the Jagannath Sabha is a temple with a mandap and Garbha Graha design. On either side of the entrance to the garbha griha are yaksha yakshis and on both side walls are murtipattas of tirthankaras.

A large number of tourists visit from the country and abroad to see the Jain Cave Group at Ellora. Chhota Kailas, Indrasabha and Jagannath Sabha caves in the Jain cave group at Verul Ellora are very spectacular.

One thought on “जैन लेणी समूह एलोरा |Jain Cave Group Ellora

Add yours

Leave a comment

Start a Blog at WordPress.com.

Up ↑