भारताची सांस्कृतिक भूमी भगवान श्रीकृष्णांच्या जीवन, उपदेश आणि दंतकथांमुळे अत्यंत समृद्ध झाली आहे. हिंदू धर्मातील सर्वाधिक पूजनीय देवतांपैकी एक असलेल्या श्रीकृष्णांच्या स्मृतींशी जोडलेल्या पवित्र स्थळांचे दर्शन घडवण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने स्वदेश दर्शन योजना अंतर्गत कृष्ण परिक्रमा (Krishna Circuit) सुरू केली आहे. श्रीकृष्णांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा विकास व परस्पर जोडणी करून धार्मिक पर्यटनासोबतच सांस्कृतिक वारसा जपणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कृष्ण परिक्रमा ही भाविक आणि पर्यटकांना समृद्ध अनुभव मिळावा यासाठी निवडलेल्या ठिकाणी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आणि सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते. उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान हरियाणा आणि ओडिशा या राज्यांतील महत्त्वाची स्थळे यात समाविष्ट आहेत, ज्यातून श्रीकृष्णांच्या जीवनातील विविध अध्याय उलगडतात. मथुरा – त्यांचा जन्मस्थळ, वृंदावन – बाललीला स्थळ, आणि द्वारका – त्यांचे प्रसिद्ध राज्य, अशा स्थळांची ही परिक्रमा भक्ती, इतिहास आणि पुराणकथांनी परिपूर्ण आहे.
स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत, या परिक्रमेचा विकास सुगम वाहतूक, स्वच्छता, सुविधा केंद्रे, माहिती केंद्रे आणि सांस्कृतिक संवर्धन या बाबींवर विशेष भर देऊन करण्यात आले आहे. यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करणे तसेच स्थानिक समाजाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीला चालना देणे, रोजगार निर्मिती आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे.
कृष्ण परिक्रमा ही पर्यटकांना उत्सव, पारंपरिक कला, भक्तिमय संगीत आणि प्रादेशिक पाककृतींचा अनुभव घेण्याची संधी देते.वारसा जपून आधुनिक सुविधा उभारणी हे कृष्ण परिक्रमा स्वदेश दर्शन योजनेचे एक उत्तम उदाहरण आहे.
भारतातील कृष्ण परिक्रमा योजना
कृष्ण सर्किट स्वदेश दर्शन योजनेत गुजरात मधील द्वारका, राजस्थान मधील नाथद्वारा, जयपुर ,सिकर हरियाणा मधील कुरुक्षेत्र उत्तर प्रदेश मधील मथुरा, वृंदावन, गोकुळ, बनारस, नंदगाव आणि गोवर्धन तसेच ओडिषा राज्यातील पुरी या श्रीकृष्णाशी संबंधित स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या गुजरात राजस्थान आणि उत्तर प्रदेशामध्ये ही योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. गुजरात मध्ये द्वारका एक्सप्रेस वे पूर्ण झाला आहे.गुजरात सरकारने द्वारका परिक्रमा पर्यटन योजना याच महामार्गावर विकसित करण्याचे ठरवले आहे.
गुजरात मधील कृष्ण परिक्रमा
द्वारका : Dwarka Gujarat Location भगवान श्रीकृष्ण कंस वधानंतर द्वारका येथे वास्तव्यास गेले. सध्या द्वारका हे ठिकाण गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात आहे. श्रीकृष्ण द्वारका येथून राज्य करीत असत. तर बेट द्वारका येथून येथे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत असत. द्वारका येथे श्री द्वारकाधीश यांचे भव्य व सुंदर मंदिर प्राचीन मंदिर आहे. द्वारका हे ठिकाण आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे; ते म्हणजे आद्य शंकराचार्यांनी भारतामध्ये चार धर्मपिठांची स्थापना केली होती. त्यापैकी द्वारका येथे त्यांनी धर्मपीठाची स्थापना केली. या धर्मपीठाला द्वारकामठ किंवा शारदा मठ या नावाने ही ओळखतात. याशिवाय द्वारका येथे रुक्मिणी देवी मंदिर, गोमती घाट आणि बेट द्वारका ही लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत.
बेट द्वारका : द्वारका येथे पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू ने शंखासुराचा वध बेट द्वारका येथे केला होता. याच ठिकाणी विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार असलेल्या मत्स्य अवतारातील विष्णूचे मंदिर आहे. या मंदिरात रुक्मिणी देवी, देवकी, राधा राणी, लक्ष्मी, सत्यभामा, जांभवती आणि श्रीकृष्णांच्या परिवारातील इतर देवदेवतांची उपमंदिरे आहेत.
द्वारका येथील सागरी पुरातत्वीय उत्खनन : हजारो वर्षांपूर्वी समुद्राची पातळी वाढल्यानंतर द्वारका नगरी समुद्राखाली लुप्त झाली होती. भारतीय पुरातत्व विभागाने या ठिकाणी सागरी पुरातत्वीय उत्खनन करून केले. त्यामध्ये द्वारका नगरीचे अनेक वास्तु व वस्तूंचे अवशेष मिळाले आहेत. हे सर्व अवशेष बेट द्वारका येथे आहेत.
राजस्थान मधील कृष्ण परिक्रमा
नाथद्वारा : Nathdwara Location नाथद्वारा हे राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील एक ठिकाण आहे. अरवली पर्वताच्या पायथ्याशी वसलेले हे निसर्गरम्य ठिकाण उदयपूरच्या ईशान्येला 48 किमी अंतरावर आहे. नाथद्वारा येथे विमान, रेल्वे आणि बसने सहज उपलब्ध आहे. नाथद्वार म्हणजे श्रीनाथजी-श्रीनाथजीकडे जाण्याचा मार्ग म्हणजे गोवर्धन गिरीधारी मथुरेहून नाथद्वाराला आले. विशेष भक्त वैष्णव पंथातील वल्लभाचार्य पंथाचा प्रभाव नाथद्वारामध्ये दिसून येतो वल्लभाचार्यांनी शुद्ध अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला होता. हे मंदिर 17 व्या शतकात बांधलेले श्री नाथजींचे प्राचीन मंदिर आहे. श्री नाथाजीची हवेली म्हणून प्रसिद्ध असलेल्या, नाथद्वाराला येणारे भक्त आणि पर्यटक जवळच असलेल्या नवनीत प्रिया जी मंदिराला आवर्जून भेट देतात. उदाहरणार्थ, वनमाळी मंदिर, मदन मोहन मंदिर, यमुना मंदिर हे सर्व मंदिरे आहेत.भक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देतात.

जयपुर- सिकर : जयपूर येथील श्री गोविंद मंदिर आणि सिकर येथील खाटू श्याम मंदिर श्रीकृष्ण परिक्रमा पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी खाटूश्याम जींचे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी इतरही अनेक देवदेवतांची मंदिरे तसेच ऐतिहासिक किल्ले आहेत.
हरियाणा मधील कृष्ण परिक्रमा
कुरुक्षेत्र– Kurukshetra Location महाभारतातील पांडव आणि कौरव यांच्यात कुरुक्षेत्र येथे प्रसिद्ध महायुद्ध लढले गेले. धर्मक्षेत्र या नावानेही या स्थळाला ओळखतात. कुरुक्षेत्र येथील युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती पर्यटनाच्या दृष्टीने या स्थळाचा विकास केला जात आहे.
उत्तर प्रदेश मधील कृष्ण परिक्रमा
श्रीकृष्ण परिक्रमा पर्यटन योजनेत उत्तर प्रदेशातील मथुरा कृष्ण जन्मस्थान, वृंदावन, गोकुळ, बरसाना, नंदगाव तसेच गोवर्धन पर्वत या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. Brindavan Mathura Location
ओडिषा मधील कृष्ण परिक्रमा
ओडिशा राज्यातील पुरी किंवा जगन्नाथ पुरी हे ठिकाण कृष्ण परिक्रमा पर्यटन योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. आद्य शंकराचार्यांनी पुरी येथे पूर्वेकडील धर्मपीठाची स्थापना केली. जगन्नाथजी या अवतारामध्ये श्रीकृष्णानी अनेक दिवस या ठिकाणी वास्तव्य केले होते. पुरी येथे दरवर्षी रथयात्राचे आयोजन केले जाते. याप्रसंगी देश विदेशातून लाखोच्या संख्येने भाविक व पर्यटक या ठिकाणी येतात. Jagannath Puri Location
कृष्ण परिक्रमा स्वदेश दर्शन योजना मध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे काय?
या योजनेत महाराष्ट्राचा समावेश नाही.कृष्ण परिक्रमा योजनेमध्ये महाराष्ट्रातील पंढरपूरचा समावेश व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा करावा. श्री विठ्ठल हे श्रीकृष्णाचे एक रूप असून श्री रुक्मिणी देवीसाठी ते पंढरपूर येथे आले होते अशी पौराणिक कथा आहे.
सारांश
पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजना अंतर्गत विकसित केलेली कृष्ण परिक्रमा ही भगवान श्रीकृष्णांच्या जीवनाशी संबंधित तीर्थस्थळांना जोडणारी आणि त्यांचा विकास करणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या उपक्रमाचे महत्त्व असे की, यातून भारताचा आध्यात्मिक वारसा जपला जातो, पर्यटन वाढते, स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि शाश्वत विकासातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
ही परिक्रमा उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि ओडिशा अशा अनेक राज्यांमध्ये पसरली असून, श्रीकृष्णांच्या इतिहास आणि दंतकथांशी जोडलेली प्रमुख ठिकाणे यात समाविष्ट आहेत. मथुरा – श्रीकृष्णांचे जन्मस्थळ – येथे मंदिरे आणि जन्माष्टमीसारखे भव्य उत्सव प्रसिद्ध आहेत. वृंदावन – घाट, बांके बिहारी मंदिर, इस्कॉन मंदिर आणि बाललीला कथा यासाठी ओळखले जाते. द्वारका – चार धामांपैकी एक – येथे द्वारकाधीश मंदिर आणि बेट द्वारका महत्त्वाचे आकर्षण आहे. याशिवाय बरसाणा (राधेचे जन्मस्थळ), गोवर्धन पर्वत, कुरुक्षेत्र (भगवद्गीतेचे उपदेशस्थान) आणि राजस्थानातील नाथद्वारा (श्रीनाथजी मंदिर) यांचा समावेश होतो.
पर्यटक सुविधांच्या दृष्टीने, कृष्ण परिक्रमेअंतर्गत चांगले रस्ते, स्वच्छ व सुलभ सार्वजनिक सुविधा, ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती देणारी केंद्रे, मंदिर परिसराचा विकास, निवास व्यवस्था, दिशादर्शक फलक आणि सुरक्षिततेची उपाययोजना यांचा समावेश आहे. कृष्ण परिक्रमा केवळ धार्मिक पर्यटनापुरती मर्यादित नसून, ती पारंपरिक संगीत, नृत्य, कला प्रकार आणि प्रादेशिक पाककृतींचा सांस्कृतिक प्रवास घडवते. भाविक आणि पर्यटक भक्तिमय उत्सवांत सहभागी होऊ शकतात, वास्तुशिल्प सौंदर्य पाहू शकतात आणि श्रीकृष्णांच्या जीवनाशी निगडित समृद्ध वारसा अनुभवू शकतात.
एकूणच, स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत कृष्ण परिक्रमा ही वारसा संवर्धन आणि आधुनिक पर्यटन सुविधा यांचा सुंदर संगम असून, ती भाविक,पर्यटक आणि संस्कृतीप्रेमींसाठी अविस्मरणीय अनुभव ठरते.
Krishna Circuit- Dwarka to Jagannath Puri
India’s cultural landscape is rich with the life, teachings and legends of Lord Krishna. To promote and promote the pilgrimage of holy places associated with the memory of Lord Krishna, one of the most revered deities in Hinduism, the Ministry of Tourism, Government of India has launched the Krishna Circuit under the Swadesh Darshan Yojana. The objective of this initiative is to preserve cultural heritage along with religious tourism by developing and interconnecting important pilgrimage sites associated with the life of Lord Krishna.
Krishna Parikrama focuses on creating world-class infrastructure and facilities at selected locations to provide a rich experience to devotees and tourists. It includes important places in the states of Uttar Pradesh, Gujarat, Rajasthan, Haryana and Odisha, which depict various chapters in the life of Lord Krishna. This circuit of places like Mathura – his birthplace, Vrindavan – the place of Balila, and Dwarka – his famous kingdom, is full of devotion, history and mythology.
Under the Swadesh Darshan Yojana, this Parikrama has been developed with special emphasis on easy transportation, cleanliness, facility centers, information centers and cultural preservation. This aims to attract domestic and international tourists as well as promote socio-economic development of the local community, generate employment and promote sustainable tourism.Krishna Parikrama offers tourists an opportunity to experience festivals, traditional art, devotional music and regional cuisine. Krishna Parikrama is a great example of the Swadesh Darshan Yojana, which preserves heritage while building modern facilities.
Krishna Circuit Scheme in India
The Krishna Circuit Parikrama tourism scheme includes Dwarka in Gujarat, Nathdwara,Jaipur and Sikar in Rajasthan, , Kurukshetra in Haryana, Mathura, Vrindavan, Gokul, Banaras, Nandgaon and Govardhan in Uttar Pradesh and Puri in Odisha. At present, this scheme is on the way to completion in Gujarat, Rajasthan and Uttar Pradesh. Dwarka Expressway has been completed in Gujarat. Gujarat Government has decided to develop Dwarka Parikrama tourism scheme on this highway.
Krishna Circuit in Gujarat
Dwarka-Lord Krishna stayed at Dwarka after killing Kansa. Presently Dwarka is a place in Devbhumi Dwarka district of Gujarat. Shri Krishna used to rule from Dwarka. So Bet used to live here with his family from Dwarka. The grand and beautiful temple of Sri Dwarkadhish is an ancient temple at Dwarka. Dwarka is famous for another reason; That is, Adya Shankaracharya established four Dharmapithas in India. Among them, he established a Dharmapitha at Dwarka. This shrine is known as Dwarka Math or Sharda Math. Apart from this, popular tourist spots in Dwarka are Rukmini Devi Temple, Gomti Ghat and Island Dwarka.
Bet Dwarka– At Dwarka According to legend Lord Vishnu killed Shankhasura at island Dwarka. At this place there is a temple of Vishnu in his Matsya avatar, the first of the ten incarnations of Vishnu. This temple has sub-temples of Rukmini Devi, Devaki, Radha Rani, Lakshmi, Satyabhama, Jambhavati and other deities of Krishna’s family.
Marine Archeological Excavations at Dwarka -Thousands of years ago, the city of Dwarka disappeared under the sea after the sea level rose. Archaeological Department of India conducted marine archaeological excavations at this place. Many buildings and objects of Dwarka city have been found in it. All these ruins are located in the island of Dwarka.
Krishna Circuit in Rajasthan
Nathdwara-is a place in Rajsamand district in Rajasthan. Nestled in the foothills of the Aravalli Mountains, this scenic spot is 48 km northeast of Udaipur.Nath Dwari is easily accessible by air, rail and bus.Nathdwara means the path to ShriNathji-ShriNathji is Govardhan Giridhari from Mathura he came to Nathdwara for his special devotees The influence of Vallabhacharya sect of Vaishnava sect is evident in Nathdwara Vallabhacharya advocated pure Advaita philosophy. This temple is an ancient temple of Shri Nathji built in 17th century AD. Popularly known as Shri Nathaji’s Haveli, devotees and tourists who come to Nathdwara make a must-visit to the Navneet Priya Ji temple located nearby. For example, Vanmali Temple, Madan Mohan Temple, Yamuna Temple are all temple sects and are visited by devotees and tourists in large numbers.
Jaipur- Sikar: Sri Govind Temple in Jaipur and Khatu Shyam Temple in Sikar are an important part of Sri Krishna Parikrama tourism. There is an ancient temple of Khatushyam ji at this place. There are many other temples of gods and goddesses as well as historical forts in this place.
Krishna Circuit in Haryana
The famous Kurukshetra Great War was fought between the Pandavas and the Kauravas in the Mahabharata. This place is known by the name Dharmakshetra. On the battlefield of Kurukshetra, Lord Krishna recited the Bhagavad Gita to Arjuna. This place is being developed for tourism.
Krishna Circuit in Uttar Pradesh
(Sri Krishna Parikrama Tourism Yojana includes Mathura Krishna Birthplace, Vrindavan, Gokul, Barsana, Nandgaon and Govardhan Parvat in Uttar Pradesh.
Krishna Circuit in Odisha
The place Puri or Jagannath Puri in the state of Odisha is included in the Krishna Circuit tourism scheme. The first Shankaracharya established the Eastern Dharmapeetha at Puri and Lord Krishna in the incarnation of Jagannathji lived in this place for many days. Lakhs of devotees and tourists come to this place Dharmapeetha at Puri and Lord Krishna in Jagannath Ji Avatar stayed at this place for many days. Lakhs of devotees and tourists come to this place
Is Maharashtra included in Krishna Circuit Swadesh Darshan Yojana ?
No,Maharashtra Government should follow up to include Pandharpur in Maharashtra to Krishna Circuit. Legend has it that Shri Vitthal is a form of Shri Krishna and he came to Pandharpur for Shri Rukmini Devi. Krishna Circuit is an innovative scheme in the field of tourism in modern India.
Summary
Developed under the Swadesh Darshan Scheme of the Ministry of Tourism, Krishna circuit is an important scheme to connect and develop pilgrimage sites related to the life of Lord Krishna. The significance of this initiative is that it preserves India’s spiritual heritage, increases tourism, creates employment opportunities for locals and boosts the local economy through sustainable development.
Krishna circuit is spread across several states like Uttar Pradesh, Gujarat, Rajasthan, Haryana and Odisha and covers major places associated with the history and legends of Lord Krishna. Mathura – the birthplace of Lord Krishna – is famous for its temples and grand festivals like Janmashtami. Vrindavan – known for its ghats, Banke Bihari Temple, ISKCON Temple and Balila Katha. Dwarka – one of the four Dhams – has Dwarkadhish Temple and Dwarka Island as major attractions. Other places include Barsana (birthplace of Radha), Govardhan Parvat, Kurukshetra (the place of preaching of Bhagavad Gita) and Nathdwara (Shrinathji Temple) in Rajasthan.
In terms of tourist amenities, Krishna circuit includes good roads, clean and accessible public facilities, historical and cultural information centres, development of temple premises, accommodation, signposting and security measures. Krishna circuit is not limited to religious tourism only, it also creates a cultural journey of traditional music, dance, art forms and regional cuisine. Devotees and tourists can participate in devotional festivals, see the architectural beauty and experience the rich heritage associated with the life of Lord Krishna.
Overall, Krishna circuit under the Swadesh Darshan Yojana is a beautiful blend of heritage conservation and modern tourism amenities, making it an unforgettable experience for devotees, tourists and culture lovers.

Leave a comment